Indian Railways google
बिझनेस

Indian Railways: रेल्वे तिकीट रिफंडच्या नियमात महत्वाचा बदल, कधीपासून होणार लागू? वाचा

Train Ticket Cancellation: भारतीय रेल्वेने तिकीट रिफंड आणि कॅन्सलेशनचे नियम बदलले आहेत. आता परतावा कमी मिळणार असल्याची शक्यता आहे. तसेच बोर्डिंग पॉइंट बदलण्याची सुविधाही बदलण्यात आली आहे.

Sakshi Sunil Jadhav

भारतीय रेल्वेने आता तिकीट रद्द करण्याच्या आणि बोर्डिंग पॉइंट बदलण्याच्या नियमांमध्ये काही महत्वाचे बदल केले आहेत. नागरिकांना या महत्वाच्या बदलामुळे खिशाला कात्री लागणार आहे. हे बदल नव्या आर्थिक वर्षापासून म्हणजेच १ एप्रिल २०२६पासून लागू केले जाणार आहेत. पुढे याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

तुम्ही रेल्वेने लांबचा प्रवास करताना आधी तिकीट बुक करत होतात. तुमच्या प्रवासाचा निर्णय बदलला तर तुम्ही ते तिकीट रद्द करत होतात. हे तिकीट पूर्वी ७२ तासांच्या आत किंवा त्यापूर्वीच केलं जायचं आणि तिकीटांची जवळपास संपूर्ण रक्कम तुम्हाला परत मिळायची. पण आता ही मुभा तुम्हाला मिळणार नाही. कारण काळाबाजर करणाऱ्यांना थांबण्यासाठी आणि सामान्य प्रवाशांना तिकीट मिळावं यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. पुढील माहितीमध्ये याविषयी सांगितले आहे.

नव्या नियमांनुसार, जर प्रवाशाने ट्रेन सुटण्याच्या ठरलेल्या वेळेच्या ८ तास अगोदर तिकीट रद्द केलं, तर त्याला कोणत्याही प्रकारचा परतावा मिळणार नाही. तसेच जर तिकीट २४ तास ते ८ तासांच्या दरम्यान रद्द केलं, तर फक्त ५०% रक्कम परत केली जाईल. प्रवाशांनी जर तिकीट ७२ तास आधी रद्द केलं, तर प्रवाशाला ७५% पर्यंत परतावा मिळेल. यामध्ये फक्त ठरलेला कॅन्सलेशन चार्ज कापला जाणार आहे. हे नवीन नियम १ एप्रिल ते १५ एप्रिल दरम्यान लागू केले जातील.

बोर्डिंग पॉईंटमध्ये सुद्धा मोठे आणि प्रवाशांना परवडणारे निर्णय घेण्यात आले आहेत. आता ट्रेनच्या सुटण्याच्या ठरलेल्या वेळेच्या ३० मिनिटं अगोदर तुम्ही चढण्याचे स्थानक बदलू शकता. अनेक रेल्वे स्थानके असलेल्या मोठ्या शहरांमध्ये ही सोय नागरिकांच्या फायद्याची ठरेल असे रेल्वे मंत्रालयाचे मत आहे. यामुळे प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही जवळच्या स्थानकावरून आपला प्रवास सुरू करता येईल. यापूर्वी, ही सुविधा फक्त चार्ट तयार होण्यापूर्वीच्या वेळेपुरती मर्यादित होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Death Certificate: मृत्यूच्या दाखल्याबाबत मोठा निर्णय, १ ऑक्टोबरपासून नियम कडक होणार; नोंदणी केली नाही तर...

Maharashtra News Live Update: आरक्षण उपवर्गीकरणासाठी मुंबईत मातंग समाज आक्रमक

Skin Tone Fashion Tips: फेअर, गव्हाळ की डस्की? स्किन टोननुसार कपड्यांचा रंग निवडण्याच्या ७ खास टिप्स

Janshatabdi Express : जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; पेण स्थानकात ३ तासांपासून रेल्वे रखडली, प्रवाशांचे हाल

Aloo Tikki Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आलू टिक्की; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT