Railway Diwali Bonus Saam Tv
बिझनेस

Railway Diwali Bonus : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता, बोनस कधी मिळणार? मोठी अपडेट

Railway News : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकार लवकरच दिवाळी बोनसला मंजुरी देण्याची शक्यता आहे. लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत हा निर्णय घेण्यात येईल.

Alisha Khedekar

  • रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनसला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • गेल्या वर्षी ११ लाख कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळाला होता.

  • बोनस वाढवा आणि आठवा वेतन आयोग स्थापन करा अशी संघटनांची मागणी आहे.

  • मंत्रिमंडळाचा हा निर्णय रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंददायी ठरू शकतो.

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत दिवाळी बोनसच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिवाळी आणि सणासुदीचा काळ लक्षात घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळाकडून हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. हा बोनस प्रामुख्याने कनिष्ठ पदांवरील रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या योगदानासाठी आणि भारतीय रेल्वेची कार्यक्षमता आणि कामगिरी सुधारण्यासाठी दिला जातो. गेल्या वर्षी सुमारे ११ लाख कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळाला होता.

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, येत्या बैठकीत बोनसची घोषणा होण्याची शक्यता आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस दिल्यास देशांतर्गत वापरात थेट वाढ होऊ शकते. अलीकडेच लागू केलेल्या जीएसटी कपातीसह या निर्णयामुळे या वर्षीच्या दिवाळीत किरकोळ विक्री आणि ग्राहकांच्या मागणीत आणखी वाढ होऊ शकते. अर्थशास्त्रज्ञांच्या मते, सणासुदीच्या काळात अशा पगार वाढीचा द्विगुणित परिणाम होतो.

रेल्वे कर्मचारी संघटनांनी सरकारने बोनस वाढवावा आणि आठव्या वेतन आयोगाची स्थापना करणारी अधिसूचना जारी करावी अशी मागणी केली आहे. भारतीय रेल्वे कर्मचारी महासंघाने (IREF) म्हटले आहे की, आतापर्यंत सहाव्या वेतन आयोगानुसार किमान पगाराच्या आधारावर बोनस दिला जात आहे. तर सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचे किमान पगार ₹१८,००० आहे.

IREF चे सरचिटणीस सर्वजीत सिंग यांनी याला अत्यंत अन्यायकारक असल्याचं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, ऑल इंडिया रेल्वे कर्मचारी महासंघाने (AIRF) देखील ₹७,००० मासिक बोनसची मर्यादा काढून टाकण्याची आणि सध्याच्या वेतन रचनेनुसार ती वाढवण्याची पुन्हा एकदा मागणी केली आहे. दरम्यान यंदाच्या दिवाळीत रेल्वे कर्मचाऱ्यांचं तोंड गोड होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सांगलीत पाऊसासाठी दानम्मा देवीला लोटांगण घालत तुकाराम बाबांचे साकडं

Rule Change : रेल्वे तिकीट ते LPG, १ जुलैपासून बदलणार 7 नियम; थेट तुमच्या खिशावर परिणाम

Heart attack prevention: या ५ सवयी तुम्हाला हार्ट अटॅकपासून वाचवतील

Beed Crime: माझ्या बहिणीचा नाद सोड...; तरुणावर जीवघेणा हल्ला, चाकूने सपासप वार अन् लोखंडी रॉडने मारहाण

उद्धव ठाकरेंना बसणार दुसरा मोठा धक्का; मुंबई महापालिकेत ऑपरेशन टायगर? VIDEO

SCROLL FOR NEXT