PPF Investment Saam Tv
बिझनेस

PPF Investment : दररोज १०० रुपये गुंतवा अन् १० लाख मिळवा; गुंतवणुकीचं गणित समजून घ्या

Siddhi Hande

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे, यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. यामध्ये बँकेच्या योजना,सरकारी योजना, पोस्ट ऑफिस योजना, एफडी यांचा समावेश असतो. जर तुम्हीही कोणत्याही योजनेत गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. तुम्ही पीपीएफ योजनेत गुंतवणूक करु शकतात.

पीपीएफ योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला ७ टक्के व्याजदर मिळते. या योजनेत तुम्ही रोज १०० रुपयांची बचत करुन १० लाख रुपये जमा करु शकतात.

सध्या गुंतवणूकीसाठी अनेक योजना आहेत. ज्यात चांगले व्याजदर मिळते. परंतु या योजनेत गुंतवणूक करणे म्हणजे मोठी जोखीम असते. त्यामुळे अशा योजनेत गुंतवणूक करा ज्यात तुम्हाला निश्चित परतावा मिळेल. अशीच योजना म्हणजे पीपीएफ स्कीम.पीपीएफ योजना ही १५ वर्षांनी मॅच्युअर होते. तुम्हाला जर या योजनेत १५ वर्षानंतरदेखील गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही करु शकतात. या योजनेत चक्रवाढ व्याजदेखील मिळते.

पीपीएफ योजनेत तुम्ही वर्षाला ५०० रुपयांची गुंतवणूकदेखील करु शकतात. एका वर्षात जास्तीत जास्त १.५० लाख रुपये जमा करु शकतात. या योजनेत तुम्हाला ७.१ टक्के व्याज मिळते. या योजनेतील गुंतवणूकीवर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटवरदेखील जास्तीत जास्त व्याज मिळवू शकतात.

या योजनेत तुम्ही दररोज १०० रुपयांची गुंतवणूक करुन १० लाख रुपये मिळवू शकतात.रोज १०० रुपये म्हणजे महिन्याला ३००० रुपयांची गुंतवणूक तुम्ही करु शकतात.१५ वर्षांच्या कालावधीसाठी तुम्हाला ९,७६,३७० रुपये मिळतील.तुम्ही या योजनेत ५.४० रुपये गुंतवू शकतात. तर यावर ४,३६,३७० रुपये व्याज मिळेल. (PPF Scheme News)

या योजनेत जर तुम्ही मॅच्युरिटीनंतर जर ५ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला जास्त पैसे मिळतात. या योजनेत जर तुम्ही २० वर्षांसाठी गुंतवणूक केली तर ७,२०,००० रुपयांची गुंतवणूक कराल. त्यावर तुम्हाला ८,७७,९८९ रुपये व्याज मिळेल. (PPF Scheme)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण देणार'; एकनाथ शिंदेंची जरांगेंच्या भूमिकेवर मोठं विधान

Walking Exercise : चालला तो जगला; थांबला तो संपला, वाचा महत्वाचे फायदे!

Neechbhang Rajyog: नीचभंग राजयोगामुळे चमकणार 'या' राशींचं नशीब; नवीन नोकरीसह बँक बॅलेन्सही वाढण्याचे योग

Ajit Pawar: राष्ट्रवादीमध्ये नाराजीनाट्य! काल ६०० कार्यकर्त्यांनी साथ सोडली, आज खंद्या समर्थाकाने दंड थोपाटले, अजित पवारांना इशारा!

Paras Mhambrey: मुंबई इंडियन्सचा मास्टरस्ट्रोक! रोहितचा विश्वासू ताफ्यात, टीम इंडियाला मिळवून दिला वर्ल्डकप!

SCROLL FOR NEXT