PPF Scheme Saam Tv
बिझनेस

PPF Scheme: कामाची बातमी! दररोज फक्त २०४ रुपये गुंतवा अन् करोडपती व्हा

PPF Scheme Make You Crorepati: सरकारच्या अनेक योजनांमध्ये भरघोस व्याज मिळते. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला दर महिन्याला निश्चित रक्कम मिळेल. पीपीएफ या योजनेत गुंतवणूक केल्यावर काही वर्षात तुम्ही करोडपती होऊ शकते.

Siddhi Hande

सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करुन नागरिकांना भरघोस व्याजदर मिळते. त्यामुळे मॅच्युरिटीनंतर त्यांना चांगले पैसे मिळतात. अशीच एक योजना म्हणजे पीपीएफ स्कीम.पीपीएफ योजनेत गुंतवणूक करुन तुम्ही १ कोटी रुपये मिळवू शकतात. पीपीएफ योजना नक्की आहे तरी काय ते जाणून घेऊया.

पीपीएम योजनेअंतर्गत तुम्ही कमीत कमी ५०० रुपये गुंतवू शकतात. तसेच जास्तीत जास्त १.५ लाखांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. या योजनेअंतर्गत तुम्ही १५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. तसेच या योजनेच मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कम पूर्णपणे टॅक्स फ्री असते.

पीपीएफ योजनेअंतर्गत गुंतवणूकीवर चांगले व्याजदर मिळते. सरकारच्या या योजनेत ७.१ टक्के व्याजदर मिळते. या योजनेत गुंतवणूकीवर चक्रवाढ व्याज मिळते.हे व्याजर दरवर्षी दिले जाते. मार्च महिन्यात खातेधारकांच्या अकाउंटला व्याजाचे पैसे जमा केले जातात.

PPF योजनेअंतर्गत खातेधारकांना भरघोस परतावा मिळतो. त्याचसोबत कमल 80C अंतर्गत १.५ लाख रुपयांची सूट मिळते. मॅच्युरिटीनंतरदेखील तुम्ही पैसे जमा करु शकतात. ५-५ वर्षांपर्यंत तुम्ही ही वॅलिडिटी पुढे करु शकतात.

पीपीएफ योजनेत मॅच्युरिटीच्या मध्ये पैसे काढू शकतात. तुम्ही ५० टक्के रक्कम काढू शकतात. तसेच पीपीएफ अकाउंटधारक ३ वर्षानंतर त्या गुंतवणूकीवर लोनदेखील काढू शकतात.या लोनची परतफेड करण्याचा कालावधी ३६ महिने आहे.

पीपीएफ योजनेअंतर्गत तुम्ही दर महिन्याच्या ५ तारखेला गुंतवणूक केली तर एक्स्ट्रा बेनेफिट मिळू शकते. या तारखेपर्यंत पैसे दिल्यास तुम्हाला पूर्ण महिन्याचे व्याजदर दिले जातात.

या योजनेत गुंतवणूक करुन तुम्ही करोडपती बनू शकतात. जर तुम्ही रोज ४०५ रुपयांची रोज बचत केली तर तुम्हाला वर्षाला १,४७,८५० गुंतवू शकतात. जर तुम्ही २५ वर्षांपर्यंत अशीच गुंतवणूक केली तर तुम्हाला ७.१ टक्के व्याजदराने १ कोटी रुपये मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shadashtak Yog: मंगळ-शनी मिळून बनवणार षडाष्टक योग, 'या' राशींचा होणार कायापालट, धनलाभ होणार

Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयने खरेदी केली आलिशान कार, किंमत ऐकून डोळे भिरभिरतील

Maharashtra News Live Updates: एसटी बसच्या अपघातात सातत्याने वाढ, वर्षभरात 3 हजार 381 अपघात

Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीत महायुतीचा अभूतपूर्व विजय, तर महाविकास आघाडीला मोठा फटका

Gokul Milk Price: शेतकऱ्यांना मोठा धक्का! गोकुळ दूध खरेदीत ३ रुपयांनी कपात

SCROLL FOR NEXT