Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून कमवा ४.५० लाख रुपये

Post Office Time Deposit Scheme: पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत तुम्हाला सर्वाधिक परतावा मिळतो. या योजनेत तुम्ही फक्त व्याजातून ४.५० लाख रुपये मिळणार आहे.

Siddhi Hande

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना

गुंतवणूकीच्या पैशांवर सरकार देते गॅरंटी

फक्त व्याजातून कमवा ४.५० लाख रुपये

प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करत असतात.भविष्यात कधीही आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी ही गुंतवणूक करणे महत्त्वाचे असते. जर तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल तर ही महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला सरकार स्वतः सुरक्षेची गॅरंटी देते. या योजनेत तुम्हाला चांगला परतावा मिळतो.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत तुम्हाला फक्त व्याजातून लाखो रुपये मिळणार आहे. या योजनेत एकदा गुंतवणूक करुन लाखो रुपयांचा फायदा होणार आहे.या योजनेत व्याजातून फक्त ४ लाख रुपये कमवू शकतात.

सुरक्षित पैसे आणि सर्वाधिक परतावा

प्रत्येकजण आपल्या महिन्याच्या कमाईतून काही ठरावीक रक्कमेची बचत करतात. यामधून त्यांना चांगला रिटर्न मिळतो. या योजनेत व्याजासोबतच खूप जास्त फायदे मिळतात. या योजनेत तुम्हाला ७.५ टक्के व्याजदर मिळतात. या योजनेत ५ वर्षांसाठी गुंतवणूक करायची आहे. या योजनेत तुम्हाला वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळे व्याजदर मिळते.

एका वर्षाच्या कालावधीसाठी ६.९ टक्के व्याज

दोन वर्षाच्या कालावधीसाठी ७ टक्के व्याजदर

तीन वर्षांच्या गुंतवणूवकीवर ७.५ टक्के व्याजदर

या योजनेत तुम्ही फक्त १००० रुपये भरुन अकाउंट उघडू शकतात. या योजनेत तुम्हाला वर्षाच्या आधारावर व्याज मिळते. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट ही सरकारी योजना आहे. यात तुम्हाला ४.५ लाख रुपये फक्त व्याजातून मिळणार आहे.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत तुम्ही ५ वर्षांसाठी १० लाख रुपयांची गुंतवणूक करु शकतात. त्यावर तुम्हाला ७.५ टक्के व्याजदर मिळते. यामुळे तुम्हाला मॅच्युरिटीवर ४,४९,९४८ रुपये व्याज मिळते. या योजनेत तुम्हाला पाच वर्षानंतर १४,४९,९४८ रुपये मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला खूप जास्त फायदा मिळणार आहे.

टॅक्सपासून सूट

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट मिळते.तसेच तुम्ही गुंतवणूकीवर लोनदेखील घेऊ शकतात. या योजनेत तुम्ही सिंगल आणि जॉइंट अकाउंट उघडू शकताच. १० वर्षांच्या मुलांच्या नावे पालक अकाउंट उघडू शकतात.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना काय आहे?


ही केंद्र सरकारच्या पोस्ट ऑफिसची योजना असून, ती सुरक्षित गुंतवणुकीसाठी ओळखली जाते. यात ठराविक मुदतीसाठी पैसे गुंतवले जातात.

या योजनेत किती व्याज मिळते?

1 वर्ष – 6.9%

2 वर्ष – 7%

3 वर्ष – 7.5%

5 वर्ष – 7.5%

किती गुंतवणुकीवर किती परतावा मिळतो?

जर ५ वर्षांसाठी ₹१० लाख गुंतवले, तर मॅच्युरिटीवर ₹४,४९,९४८ व्याज मिळेल. एकूण रक्कम ₹१४,४९,९४८ होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना धक्का; माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द?

Bigg Boss Marathi Fame Actor : गुलीगत सूरज चव्हाणनंतर बिग बॉस मराठीचा 'हा' अभिनेता चढणार बोहल्यावर; थाटात पार पडलं केळवण, पाहा VIDEO

RBI Jobs: कोणतीही परीक्षा नाही थेट RBI मध्ये नोकरी; मिळणार भरघोस पगार; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Dharashiv : हातात कोयते, गावठी कट्टे आणि हवेत गोळीबार, तुळजापूर राड्यात भाजपा आमदाराच्या पीएच नाव समोर

Maharashtra Corporation Election: महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी, मुंबईतल्या मराठी पट्ट्यासाठी शिंदे सेना आग्रही

SCROLL FOR NEXT