Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: फक्त व्याजातून १२ लाख, पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना; एकदा कॅलक्युलेशन जाणून घ्याच!

Post Office Senior Citizen Scheme: पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला फक्त व्याजातूनच १२ लाख रुपये मिळणार आहे.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे, यासाठी वेगवेगळ्या योजना, एफडीमध्ये गुंतवणूक करत असतात. पोस्ट ऑफिसच्यादेखील अनेक योजनांमध्ये चांगला परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे हे सोयीस्कर असते. त्यामुळे तुम्हाला कोणतेही नुकसान होत नाही. अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस सीनियर सिटीजन स्कीम.

पोस्ट ऑफिस सिनियर सिटीजन स्कीमअंतर्गत तुम्ही फक्त व्याजातूनच १२ लाख रुपये कमवू शकतात. या योजनेत कोणतीही जोखीम नसते. या योजनेत तुम्हाला टॅक्स बेनिफिटदेखील मिळतो. (Post Office Senior Citizen Scheme)

पोस्ट ऑफिस सिनियर सिटीजन योजनेत जास्तीत जास्त ३० लाख रुपये गुंतवू शकतात.या योजनेत तुम्ही ५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. कमीत कमी १००० रुपयांपासून तुम्ही या योजनेत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत सर्वाधिक व्याजदर म्हणजे ८.२ टक्के व्याज दिले जाते. हे व्याजदर तिमाही आधारावर दिले जाते. त्यामुळे या योजनेत तुम्हाला भरघोस परतावा मिळणार आहे.

पोस्ट ऑफिस सिनियर सिटीजन योजनेत जर तुम्ही वर्षाला ३० लाख रुपये गुंतवले तर ५ वर्षात ८.२ टक्क्यांनी तुम्हाला १२,३०,००० रुपये व्याज मिळतो. तिमाही आधारावर ६१,५०० रुपये तुम्हाला मिळतील. त्यामुळे ५ वर्षानंतर तुम्हाला ४२ लाख ३० हजार रुपये मिळणार आहेत.

या योजनेत जर तुम्ही पाच वर्षासाठी १५ लाख रुपये गुंतवले तर त्यावर ८.२ टक्के व्याजदर मिळते. म्हणजेच मॅच्युरिटीनंतर तुम्हाला ६ लाख १५ हजार रुपये व्याजदर मिळणार आहे. तिमाही आधारावर ३०,७५० रुपये मिळणार आहे. १५ लाख रुपये आणि व्याज असे तु्म्हाला २१ लाख १५ हजार रुपये मिळणार आहे. (Post Office Senior Citizen Scheme Benefits)

या योजनेचा लाभ ६० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील उमेदवार घेऊ शकतात. ५ वर्षानंतर ही योजना मॅच्युअर होते. या योजनेत तुम्ही ५ वर्षानंतरदेखील गुंतवणूक करु शकतात. योजनेअंतर्गत कलम ८० सी अंतर्गत कर सूट मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : बाप लेकाचा स्वॅग न्यारा! दबंग स्टाइलमध्ये भाईजान बसला वडिलांच्या बाईकवर, पाहा PHOTO

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

Mankhurd Exit Poll: अबू आझमी की नवाब मलिक, मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

SCROLL FOR NEXT