Post Office Senior Citizen Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: ज्येष्ठ नागरिकांसाठी बेस्ट आहे ही पोस्टाची योजना, गुंतवणुकीवर मिळणार जबरदस्त परतावा

Post Office Senior Citizen Scheme: पोस्ट ऑफिसच्या योजना या गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित मानल्या जातात. पोस्ट ऑफिसकडून अनेक योजना चालवल्या जातात. यातच ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खास योजना चालवली जाते.

साम टिव्ही ब्युरो

Post Office Senior Citizen Scheme:

पोस्ट ऑफिसच्या योजना या गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित मानल्या जातात. पोस्ट ऑफिसकडून अनेक योजना चालवल्या जातात. यातच ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खास योजना चालवली जाते. ज्यात गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो. या योजनेचे नाव सिनियर सिटीझन सेव्हिंग योजना आहे.

निवृत्तीनंतर वृद्धांना अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे अनेकदा दिसून आलं आहे. अशातच तुम्हाला निवृत्तीनंतर मिळालेले पैसे, तुम्ही पोस्ट ऑफिसच्या सिनियर सिटीझन सेव्हिंग योजनेत गुंतवणूक करू शकता. या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला जबरदस्त परतावा मिळू शकतो. सध्या या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला 7.2 टक्के व्याज दिले जात आहे. जे अनेक बँकांच्या एफडी दरांपेक्षा जास्त आहे. याशिवाय या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला अनेक मोठे फायदेही मिळू शकते. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... (साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोस्ट ऑफिस सिनियर सिटीझन सेव्हिंग योजनेमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला बाजारातील कोणत्याही प्रकारच्या जोखमीचा सामना करावा लागणार नाही. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून ही योजना पूर्णपणे सुरक्षित आहे.  (Latest Marathi News)

या योजनेत तुम्ही किमान 1 हजार रुपयांची गुंतवणूक करू शकता. तर गुंतवणुकीची कमाल मर्यादा 30 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर सूटही मिळते.

तुम्ही आयकराच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा लाभ देखील घेऊ शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 5 वर्षांचा लॉक इन पीरियड मिळतो.

ही एक अल्प बचत योजना आहे. ज्याला केंद्र सरकारचा पाठिंबा आहे. ज्येष्ठ नागरिक त्यांच्या निवृत्तीनंतरचे पैसे या योजनेत गुंतवू शकतात आणि त्यावर चांगला परतावा मिळवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर

Weather Update : राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; हवामान खात्याने काय अंदाज दिला?

India Tourism : डोंगरमाथा, खडकाळ परिसर; प्राचीन इतिहासाची साक्ष देणारा 'हा' किल्ला खूप कमी लोकांना माहितेय

Bigg Boss Marathi 6 Winner : "माझ्या हातात ही ट्रॉफी..."; 'बिग बॉस मराठी ६' ची विजेती तन्वी कोलतेची नवीन पोस्ट चर्चेत | VIDEO

Dry Hair Home Remedy: उन्हामुळे केस ड्राय होतायत? १ घरगुती उपाय, केस होतील सॉफ्ट अन् शायनी

SCROLL FOR NEXT