Post Office Scheme google
बिझनेस

Post Office Scheme : ₹१००० गुंतवा अन् महिन्याला मिळवा २०, हजार व्याज; पोस्टाच्या या योजनेत व्हाल मालामाल

Senior Citizen Savings: पोस्ट ऑफिस सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये कमी गुंतवणुकीत सुरक्षित आणि हमी परतावा मिळतो. दरमहा २० हजारांपर्यंत व्याज मिळवून निवृत्तीनंतर आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी ही योजना उपयुक्त आहे.

Sakshi Sunil Jadhav

प्रत्येकालाच सेव्हिंग महत्वाची असते. रिटायरमेंटनंतर खर्चासाठी पैसे हवेच असतात. त्यासाठी आपण इतरांवर अवलंबून राहू नये, म्हणून बचत करतो. पण घरात बचत करण्याऐवजी तुम्ही बॅंकेत रक्कम जमा केली तर तुम्हाला याचा जबरदस्त फायदा होतो. तुम्ही जर यासंबंधीत गुंतवणुकीचा विचार करत असाल तर पोस्टातल्या योजनांमध्ये पैसे जमा करु शकता.

पोस्ट ऑफिस सीनियर सिटीजन स्कीम (SCSS) ही योजना तुम्हाला भविष्यात तुमच्या गुंतवणूकीवर महिन्याला २० हजारांपेक्षा जास्त व्याज मिळवून देते. तसेच सरकारने नागरिकांसाठी ही विशेष योजना सुरु केली आहे. यामध्ये ६० किंवा त्याच्यापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना गुंतवणूक करता येते. पण ५५ ते ६० वयाच्या व्यक्ती सुद्धा यामध्ये पैसे गुंतवू शकतात. तसेच जे लोक ५० वयातचे रिटायर झालेत त्यांच्यासाठी सुद्धा ही योजना बेस्ट आहे.

पोस्टाच्या या योजनेत तुम्ही नवरा-बायकोचं मिळून जॉइन्ट बँक खाते (Joint Account) उघडू शकता. या योजनेचा कालावधी हा ५ वर्षांचा असतो. पण पुढील ३ वर्षे तुम्ही गुंतवणूक वाढवूही शकता. यात तुम्हाला १००० रुपयांपासून सुद्धा गुंतवणूक करता येते. जास्तीत जास्त ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकता. म्हणजे वर्षाला २.४६ लाख रुपये व्याज मिळेल.

म्हणजेच तुम्हाला महिन्याला २०,००० पर्यंतचे व्याज मिळेल. याने तुम्हाला भविष्यात पैशाच्या समस्यांना सामोरं जावं लागणार नाही. या सरकारी योजनेत तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला खूप जास्त लाभ मिळेल. यासाठी तुम्हाला पोस्टात तुमचे महत्वाचे पुरावे घेऊन जावे लागेल. यात फार प्रोसेस करावी लागत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tamilnadu Tourism: मे महिना कायम राहील आठवणीत, तमिळनाडूतल्या या स्वर्गाहून सुंदर ठिकाणांना नक्कीच द्या भेट

Maharashtra News Live Update: धर्माबाद तालुक्यातील माष्टी येथे झाली होती दोन गटात हाणामारी

Face Care: पिंपल्स कमी करुन नॅचरल सॉफ्ट चेहरा हवा असेल तर घरी तयार केलेला 'हा' फेसपॅक नक्की ट्राय करा

माजी मंत्र्याचे निधन, मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली; औरंगाबादमधून लढवली होती निवडणूक

Ranveer Singh: 'धुरंधर' नंतर रणवीर सिंहची मोठी तयारी! 'या' पुस्तकावर आधारित सिनेमामध्ये साकारणार महादेवाची भूमिका

SCROLL FOR NEXT