Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme : दररोज ३३३ रुपये जमा करा अन् लाखोंचा परतावा मिळवा; पोस्ट ऑफिसने आणली नवी योजना

Post Office Recurring Deposit Scheme: सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे, यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. अनेक सरकारी योजना, पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर चांगला परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसची अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस आरडी स्कीम. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला रोज ३३३ रुपयांची गुंतवणूक करायची आहे. या योजनेत तुम्हाला १७ लाख रुपये मिळणार आहेत.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करावी लागत नाही.यामध्ये तुमचे पैसे सुरक्षित असतील याची गॅरंटी स्वतः सरकारकडून दिली जाते. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला पैसे जमा करावे लागणार आहेत. जर तुम्ही विसरलात तर तुम्हाला १ टक्के फी भरावी लागते.या योजनेत मॅच्युरिटीचा कालावधी ५ वर्षांचा असतो. s

पोस्ट ऑफिसची ही उत्तम सेव्हिंग स्कीम आहे. तुम्ही या योजनेत १०० रुपयांपासून पैसे गुंतवू शकतात. या योजनेत सिंगल आणि जॉइंट असे दोन अकाउंट उघडण्याची सुविधा दिली जाते. या योजनेत ६.८ टक्के व्याजदर दिले जाते. या व्याजावर तुम्हाला चक्रवाढ व्याजदेखील मिळते.

या योजनेत तुम्ही जर रोज ३३३ रुपये जमा करत असाल तर महिन्याला १०,००० रुपये जमा होतात. एका वर्षात १.२० लाख रुपयांची गुंतवणूक तुम्ही करता. मॅच्युरिटी कालावधीपर्यंत तुम्ही ५,९९,४०० रुपये जमा होतात. त्यामुळे चक्रवाढ व्याज मिळून तुम्हाला १,१५,४२७ रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला ७,१४,८२७ रुपये मिळतील. (Post Office Rd Scheme)

जर तुम्ही या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड ५ वर्षांसाठी वाढवत असाल म्हणजेच एकूण १० वर्षांचा करत असाल तर तुम्ही १२,००,००० रुपये जमा करतात. त्यावर तुम्हाला व्याज मिळेल. तुम्हाला १७,०८,५२६ रुपये मिळणार आहेत. (Post Office Scheme)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT