Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Scheme: महिन्याला ₹५००० गुंतवा अन् लखपती व्हा; पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्किम करेल मालामाल

Post Office Recurring Deposit Scheme: पोस्ट ऑफिसची RD योजना ही सुरक्षित गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. दरमहा ₹१०० पासून सुरुवात करून १० वर्षांत ₹८.५४ लाखांचा परतावा मिळू शकतो.

Bhagyashree Kamble

शेअर बाजारातील वाढत्या तोट्यामुळे अनेक गुंतवणूकदार आता कमी जोखमीच्या आणि सुरक्षित पर्यायांकडे वळताना दिसत आहेत. जर आपल्याला कमी गुंतवणूक करून चांगला नफा कमवायचा असेल तर, ही योजना खास तुमच्यासाठी आहे. ही योजना सुरक्षित गुंतवणुकीसोबतच उत्तम परतावा देते. रिकरिंग डिपॉझिट स्किम या योजनेचं नाव असून, ५ वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर आपल्याला उत्तम परतावा मिळतो.

पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेत केवळ १०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. पोस्ट ऑफिस आरडीचा मॅच्युरिटीचा कालावधी पाच वर्षांचा आहे. परंतु जर, तुम्हाला हा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी खाते बंद करायचे असेल, तर ही सुविधा या बचत योजनेत देखील आहे.

या योजनेत आणखी एक विशेष बाब म्हणजे, खाते सुरू झाल्यानंतर एक वर्ष पूर्ण झाल्यावर, आपल्याला आपल्या एकूण गुंतवणुकीच्या ५० टक्क्यांपर्यंत कर्ज घेण्याची सुविधा मिळते. या कर्जावरील व्याजदर नियमित व्याजापेक्षा केवळ २ टक्के अधिक असतो. दरम्यान, पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला ६.८ टक्के व्याज मिळते.

आपण या योजनेअंतर्गत जर ५००० रूपये गुंतवले तर, त्याच्या मॅच्युरिटी कालावधीत म्हणजेच ५ वर्षात खात्यात ३लाख रूपये जमा होतील. ६.७ टक्के दराने त्यावर ५६,८३० रूपये व्याज मिळेल. म्हणजेच पाच वर्षात आपल्या खात्यात एकूण ३,५६,८३० रूपये जमा होतील. जर आणखी ५ वर्षांसाठी वाढवले तर, १० वर्षात आपल्या खात्यात ६,००,००० रूपये जमा होतील. यासह ठेवीवरील ६.७ टक्के दराने व्याजाची रक्कम २,५४,२७२ रूपये होतील. अशाप्रकार १० वर्षात आपल्या खात्यात ८,५४,२७२ रूपये जमा होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT