Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार ५ लाख; कॅल्क्युलेशन वाचा

Post Office NSC Scheme: पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग स्कीम ही खूप फायदेशीर आहे. या योजनेत तुम्हाला चक्रव्याढ व्याजदेखील मिळते. या योजनेत तुम्ही फक्त व्याजातून जवळपास ५ लाख रुपये मिळवू शकतात.

Siddhi Hande

पोस्टाची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजना

फक्त व्याजातून मिळणार ५ लाख रुपये

योजनेचं कॅल्क्युलेशन वाचा

पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला सुरक्षित परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर कमी गुंतवणूकीत तुम्ही जास्त परतावा मिळू शकतात. दरम्यान, या योजनेत सुरक्षिततेची काळजी नाही. योजनेच्या परताव्यावर सरकार गॅरंटी देते. पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत फक्त व्याजातून लाखो रुपये कमवू शकतात.

पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत चांगला परतावा मिळतो. या योजनेत सध्या ७.७ टक्के व्याजदर दिले जाते. हे व्याजदर तिमाही आधारावर बदलले जाते. या योजनेत चक्रव्याढ व्याजदेखील मिळते. मॅच्युरिटीच्या वेळी हे पैसे ट्रान्सफर केले जातात. त्यामुळे या योजनेतील गुंतवणूक ही फायद्याची ठरते. या योजनेचा लॉक इन पीरियड ५ वर्षांचा आहे. तोपर्यंत गुंतवणूक करायची असते.

एनएससी योजनेत तुम्ही १००० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. जास्तीत जास्त कितीही रुपयांची गुंतवणूक करु शकतात. जेवढी गुंतवणूक जास्त तेवढा त्यावर मिळणारा परतावादेखील जास्त असतो. या योजनेत मुलांच्या नावानेदेखील अकाउंट ओपन करु शकतात. हे अकाउंट आई वडील ऑपरेट करु शकतात. या योजनेत ५ वर्षानंतर व्याजाची रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होते.

पोस्ट ऑफिसच्या एनएससी स्कीममध्ये तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अकाउंट उघडू शकतात. या योजनेत तुम्हाला टॅक्स बेनिफिटदेखील मिळते. १.५ लाखांवर टॅक्स लागत नाही.

व्याजातून मिळणार ५ लाख रुपये

पोस्टाच्या या योजनेत तुम्ही जर ५ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला लाखो रुपयांचे व्याज मिळणार आहेत. ५वर्षांसाठी ७.७ टक्के व्याजदर मिळणार आहे. तुम्हाला मॅच्युरिटीनंतर एकूण ७,२४,५१७ रुपये मिळणार आहेत. तुम्ही फक्त व्याजातून २,२४,५१७ रुपय कमवू शकतात. त्यामुळे ही योजना फक्त फायदाच देते. या योजनेत जर तुम्ही ११ लाख रुपये गुंतवले तर त्यावर फक्त व्याज ४,९३,९३७ रुपये मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला जवळपास ५ लाख रुपये मिळणार आहे. तुम्ही जेवढी जास्त रक्कम गुंतवणार तेवढा जास्त परतावा तुम्हाला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT