आजकाल गुंतवणूक करताना बरेचजण सुरक्षित पर्याय शोधतात. शेअर बाजारातल्या जोखमी टाळून ठरावीक वर्षांसाठी पैसे गुंतवायचे असतील, तर पोस्ट ऑफिसच्या बचत योजना उपयोगी ठरू शकतात. अशीच एक योजना म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC). या योजनेच एकदाच पैसे गुंतवून ५ वर्षांनंतर चांगला परतावा मिळवता येतो. महत्त्वाचं म्हणजे, योग्य व्याजदरानुसार मोठी रक्कम व्याजाच्या स्वरूपात मिळू शकते.
पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेचा कालावधी ५ वर्षांचा आहे. या योजनेवर ७.७ टक्के व्याजदर गृहीत धरला आहे. यामध्ये चक्रवाढ पद्धतीने व्याजाची गणना केली जाते. म्हणजेच जमा झालेल्या व्याजावरही पुढच्या काळात व्याज मिळतं.
समजा, तुम्ही NSC योजनेत एकरकमी ११ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली. वार्षिक ७.७ टक्के व्याजदर आणि ५ वर्षांचा कालावधी गृहीत धरल्यास मुदतपूर्तीवेळी तुम्हाला अंदाजे १६ लाख ६६ हजार ३८९ रुपये मिळू शकतात.
यामध्ये तुमची मूळ गुंतवणूक ११ लाख ५० हजार रुपये असेल, तर अंदाजे ५ लाख १६ हजार ३८९ रुपये व्याज मिळेल. म्हणजेच पाच वर्षांत गुंतवणुकीवर पाच लाखांहून जास्त व्याज मिळू शकतं.
तुम्ही या योजनेत किमान १००० रुपयांपासून खातं उघडू शकता. त्यानंतर १०० रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते. यामध्ये गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे आपल्या आर्थिक क्षमतेनुसार पैसे गुंतवता येतात.
NSC योजनेत गुंतवणूक केल्याने जुन्या करप्रणालीअंतर्गत आयकर कायद्याच्या कलम 80C नुसार पात्र गुंतवणुकीवर एका आर्थिक वर्षात १.५० लाख रुपयांपर्यंत करसवलत मिळू शकते. पण नवीन करप्रणालीमध्ये ही सवलत उपलब्ध नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.