Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करा अन् महिन्याला ९२५० मिळवा; जाणून घ्या सविस्तर

Post Office Monthly Saving Scheme: पोस्ट ऑफिसच्या मंथली सेव्हिंग योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेत गुंतवणूक केल्यावर मॅच्युरिटीनंतर ९००० रुपये मिळतात.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी बचत करतात. यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. काही योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भविष्यात दर महिन्याला ठरावीक पैसे मिळतात. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेत तुम्हाला ७.४ टक्के व्याजदर मिळते. या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त ९ लाख रुपये गुंतवू शकतात. तर जॉइंट अकाउंटमध्ये १५ लाख रुपये गुंतवू शकतात. (Post Office Monthly Saving scheme)

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजनेत १८ आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिक अर्ज करु शकतात.तसेच तुम्ही अल्पवयीन मुलाचे अकाउंट उघडू शकतात. परंतु त्यासाठी तुम्हाला पालक म्हणून अर्ज करावा लागेल. तुमचा मुलगा किंवा मुलगी १० वर्षांची झाली तर त्याचे तुम्ही अकाउंट उघडू शकतात.

या योजनेत कमीत कमी १०० रुपयांची गुंतवणूक करु शकतात. सिंगल अकाउंटमध्ये ९ लाख तर जॉइंट अकाउंटमध्ये १५ लाख रुपये गुंतवू शकतात.या योजनेत ७.४ टक्के व्याजदर मिळते.

या योजनेत दर महिन्याला नागरिकांच्या अकाउंटला व्याजदर जमा होते. जर या योजनेत ग्राहकांनी व्याज काढले नाही तर ते पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंटमध्ये जमा होते. या योजनेचा कालावधी ५ वर्षांचा आहे. ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नवीन व्याजदर दिले जाते.(Post Office Scheme)

या योजनेत जर तुम्ही जॉइंट अकाउंट काढून १५ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला त्यावर वर्षाला १,११,००० रुपये व्याज मिळेल. त्यामुळे तुम्हाला ९२५० रुपये महिन्याला मिळेल.

जर तुम्ही सिंगल अकाउंटमध्ये ९ लाख रुपये जमा केले तर त्यावर ६६,६०० रुपये व्याज मिळते. त्यामुळे तुम्हाला महिन्याला ५५५० रुपये मिळणार आहे.

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम ही एफडीपेक्षा जास्त व्याजदर देते. ५ वर्षानंतर तुम्हाला या योजनेत व्याजदर बदलले जाते. तुम्ही या योजनेत ५ वर्षानंतर पैसे काढू शकतात.या योजनेत एका वर्षाआधी खाते बंद करु शकत नाही. या योजनेत जर तुम्ही १ ते ३ वर्षांमध्ये खाते बंद केले तर २ टक्के रक्कम कापली जाईल. ३ ते ५ वर्षांमध्ये खाते बंद करता तर १ टक्के रक्कम कापली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT