PM Vishwakarma Yojana Saam Tv
बिझनेस

PM Vishwakarma Yojana: तरुणांना व्यावसायिक होण्याची सुवर्णसंधी! सरकार देतंय ३ लाखांचं कर्ज, काय आहे पीएम विश्वकर्मा योजना?

PM Vishwakarma Yojana Application Process: सरकारने तरुणांसाठी पीएम विश्वकर्मा योजना राबवली आहे. या योजनेत तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी ३ लाख रुपयांचे लोन दिले जाते.

Siddhi Hande

केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी नेहमी नवनवीन योजना राबवत असते. या योजनांमुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक मदत मिळते. सरकार तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणत्याही हमीशिवाय कर्ज देते. अशीच एक योजना म्हणजे पीएम विश्वकर्मा योजना. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत स्वतः चा बिझनेस सुरु करण्यासाठी सरकार आर्थिक मदत करते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३ मध्ये ही योजना सुरु केली आहे.या योजनेअंतर्गत विविध क्षेत्रातील कामगारांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. देशातील पारंपारिक कौशल्यांना पाठिंबा देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत १८ ट्रेडना लाभ मिळतो.

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नागरिकांना ३ लाखांचे लोन दिले जाते. स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी सुरुवातील भांडवल म्हणून ही मदत केली जाते. या योजनेअंतर्गत कर्जाशिवाय कामगारांना स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग दिले जाते. ज्यामुळे त्यांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी अडचणी येत नाही.

या योजनेअंतर्गत उमेदवारांना लोन दोन टप्प्यांमध्ये दिले जाते. सुरुवातील व्यवसाय सुरु करण्यासाठी १ लाख रुपये दिले जातील त्यानंतर बिझनेस वाढवण्यासाठी मार्केटिंग करण्यासाठी २ लाख रुपये दिले जातात. या कर्जावर ५ टक्क्यांनी व्याज दिले जाते. याचसोबत स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग दिले जाते. या दरम्यान नागरिकांना ५०० रुपयांची स्टायपेंड दिली जाते.

या योजनेअंतर्गत धोबी, कारपेंटर, मूर्तिकार अशा अनेक कर्मचाऱ्यांना लाभ दिला जातो. या योजनेचा लाभ फक्त भारतीय नागरिक घेऊ शकतात. या योजनेसाठी १८ ते ५० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडसंदर्भात सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला www.pmvishwakarma.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तिथे तुम्हाल अर्ज करण्यासाठी फॉर्म दिसेल. तो फॉर्म भरुन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT