PM Surya Ghar Yojana google
बिझनेस

PM Surya Ghar Yojana : PM सूर्य घर योजनेचा विक्रम! १९ लाख कुटुंबांचे वीजबिल शून्य; महिन्याला ३५०० रुपयांपर्यंत अतिरिक्त उत्पन्न

Rooftop Solar : पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत ५० लाखांपेक्षा जास्त कुटुंबानी सोलर पॅनेल बसवले असून १९ लाख कुटुंबांचे वीज बिल शून्य झाले आहे.

Sakshi Sunil Jadhav

केंद्र सरकारच्या पीएम सूर्य घर योजनेची चर्चा सध्या सर्वत्र पसरत आहे. याचे कारण म्हणजे मोफत वीज योजना (Muft Bijli Yojana) ने मोठा टप्पा गाठला आहे. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत ५०.०६ लाखांपेक्षा जास्त कुटुंबांनी घरांच्या छतावर सोलर पॅनेल बसवले आहेत. फक्त दोन वर्षांच्या कालावधीत या योजनेने विक्रमी प्रगती केलेली असून पूर्वीचे सर्व विक्रम मोडले आहेत.

या योजनेसाठी केंद्र सरकारने ७५,०२१ कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. विशेष म्हणजे, योजना सुरू होण्याआधीच्या १० वर्षांमध्ये फक्त ७.९४ लाख रूफटॉप सोलर कनेक्शन बसवले गेले आहे. आता मात्र दर सहा दिवसांनी एक लाख नवीन कुटुंबे या योजनेत सहभागी होत आहेत.

या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे १९ लाख कुटुंबांचे वीज बिल आता शून्य झाले आहे. सरकारने थेट लाभ हस्तांतरण (DBT) माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात २८,०२४ कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदान जमा केले आहे.

याशिवाय, ज्या कुटुंबांनी स्वत:च्या गरजेपेक्षा जास्त वीज निर्माण केली, त्यांनी ती वीज ग्रीडला विकून अतिरिक्त उत्पन्नही मिळवले आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १२ लाखांहून जास्त कुटुंबांनी मिळून ४२१ कोटी रुपयांची कमाई केली. प्रत्येक कुटुंबाला सरासरी ३५०० रुपयांचे अतिरिक्त वार्षिक उत्पन्न मिळाले. या योजनेचा लाभ PMAY, BPL तसेच SC/ST प्रवर्गातील कुटुंबांनाही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. कमी व्याजदरात कर्जाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत *२१.८७ लाख अर्जदारांना ५.७५ टक्के व्याजदराने कर्ज मंजूर करण्यात आले आहे.

योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि डिजिटल असल्यामुळे अर्ज करणे, नेट मीटरिंग, कर्ज मंजुरी आणि अनुदान मिळवणे अधिक सोपे झाले आहे. तसेच अनेक राज्यांनी अर्ज शुल्क आणि नेट-मीटरिंग शुल्कही रद्द केले आहे. या उपक्रमामुळे देशात सौरऊर्जेला मोठी चालना मिळत असून, रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होत आहेत. हजारो नोंदणीकृत विक्रेते, प्रशिक्षित तंत्रज्ञ आणि सरकारी इमारतींवर सोलर पॅनेल बसवण्याचे कामही वेगाने सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT