PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: १३ कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा हप्ता या तारखेला जमा होणार

PM Kisan Yojana Next Installment: पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे पैसे देण्यात येणार आहेत.

Siddhi Hande

केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये मिळतात. या योजनेत दर चार महिन्यांनी पैसे दिले जातात. दरम्यान, आतापर्यंत या योजनेत १८ हप्ते देण्यात आले आहेत. आता लवकरच १९ वा हप्ता मिळणार आबे.

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, पीएम किसान सन्मान योजनेचा १९ वा हप्ता २४ फेब्रुवारीला जमा केला जाणार आहे. याबाबत केंद्रिय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी माहिती दिली आहे.

पीएम किसान सन्मान निधीचा शेवटचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला होता. त्यानंतर आता चार महिन्यांनी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात पैसे दिले जाणार आहेत. या योजनेत आता १३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. मात्र,तुम्ही जर केवायसी केले असेल तरच तुमच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन केवायसी करा. तुम्ही ऑनलाइन पद्धतीनेही केवायसी करु शकतात.

ऑनलाइन पद्धतीने केवायसी कसं करायचं?

तुम्ही सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

त्यानंतर होमपेजवर लिहलेल्या ई- केवायसी या ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर आधार नंबर टाका सर्च करा.

यानंतर मोबाईल नंबर टाका. तुम्हाला ओटीपी येईल. यानंतर तुमची केवायसी प्रोसेस पूर्ण होईल.

ज्या शेतकऱ्यांनी तारखेपूर्वी केवायसी केले नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत. शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत व्हावी, उपकरणे घेण्यासाठी पैसे मिळावेत, या उद्देशातून ही योजना राबवण्यात आली आहे. देशातील कोट्यवधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. महाराष्ट्रात अशीच एक नमो शेतकरी योजना आहे. ज्यामध्येही शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात वादळी पावसाचे थैमान

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरटचे आजचे दर

Namo Shetakri Yojana: शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

Dandruff Home Remedy : केस धुवण्यापूर्वी करा 'हे' काम, टाळूला येणार नाही खाज अन् कोंडाही होईल गायब

SCROLL FOR NEXT