PM Kisan Yojana  meta ai
बिझनेस

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

PM Kisan New Registration: शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेत नवीन शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज कसा करावा, कोणती कागदपत्रे गरजेची आहेत, अर्जाची संपूर्ण प्रोसेस, पडताळणी आणि वार्षिक ६००० लाभ मिळवण्याची माहिती इथे जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिक लाभ मिळावा म्हणून सरकार विविध योजनांचा लाभ घेत देत असतं. पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते. पण पात्र असूनही अनेक नवीन शेतकरी अद्याप या योजनेचा लाभ घेऊ शकलेले नाहीत. तसेच नुकतेच १८ वर्ष पूर्ण केलेले आणि पात्र ठरलेले अनेक तरुण शेतकरीही या योजनेत सहभागी होण्याची तयारी करत आहेत.

सरकारने नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि सोपी केल्यामुळे आता शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयांचे सतत फेरफटके मारण्याची गरज उरलेली नाही. घरबसल्या अधिकृत संकेतस्थळ किंवा पीएम किसान मोबाईल अॅपच्या माध्यमातून अर्ज करता येतो.

अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे गरजेची आहेत. अर्जदाराकडे वैध आधार कार्ड, शेतीच्या मालकीचे कागदपत्रे जसं की, खसरा-खतौनी, आधारशी जोडलेले बँक खातं आणि आधारशी लिंक असलेला सक्रिय मोबाईल क्रमांक असणं गरजेचं आहे. या कागदपत्रांच्या आधारे अर्जाची पडताळणी केली जाते.

नोंदणीसाठी सर्वात आधी पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन 'New Farmer Registration' या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर ग्रामीण किंवा शहरी शेतकरी म्हणून योग्य ऑप्शन निवडून आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, राज्याची माहिती आणि ओटीपी टाकून पडताळणी पूर्ण करून घ्या. त्यानंतर अर्जामध्ये नाव, बँक खात्याचा तपशील, आयएफएससी कोड तसेच जमिनीच्या मालकीसंबंधीची माहिती अचूक भरा. गरज असल्यास संबंधित कागदपत्रंही अपलोड करा.

अर्ज सादर झाल्यानंतर त्याची पडताळणी ब्लॉक, तहसील, जिल्हा आणि राज्य स्तरावर केली जाते. सर्व माहिती योग्य असेल तर संबंधित शेतकऱ्याचे नाव लाभार्थी यादीच जमा केले जाते. त्यानंतर योजनेअंतर्गत मिळणाऱ्या २००० च्या हप्त्यांची रक्कम थेट बँक खात्यात जमा व्हायला सुरूवात होते. त्यामुळे पात्र असलेल्या प्रत्येक नव्या शेतकऱ्याने ही सोपी ऑनलाइन प्रोसेस पूर्ण करून पीएम किसान योजनेचा लाभ घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक..

दुष्काळात शेतकरी संकटात, पण ‘गोकुळ’च्या ठरावधारकांची चंगळ; एका ठरावासाठी लाखाची बोली?

Makeup Powder: मेकअप पावडर निवडताना गोंधळ होतोय? तुमच्या स्किन टाइपनुसार अशी निवडा परफेक्ट पावडर

Milk tea: एकदा बनवलेला चहा किती तासांनी खराब होतो?

भाजपच्या दिग्गज महिला नेत्याचे होणार पुनरागमन; मोदी मंत्रिमंडळात वर्णी लागणार? घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT