PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये कधी जमा होणार? पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

PM Kisan 24th Installment Date: पीएम किसान योजनेच्या २४व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. ऑक्टोबरमध्ये २ हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे.

Sakshi Sunil Jadhav

PM Kisan Yojana 24th Installment: शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकार विविध योजना राबवत असते. प्रधानंमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातल्या पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आता शेतकऱ्यांना योजनेच्या २४ व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

योजनेचा मागचा म्हणजे २३ वा हप्ता जून महिन्यात जारी केला होता. त्यामुळे साधारण चार महिन्यांचे अंतर लक्षात घेतल्यावर पुढचा हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांमध्ये २४वा हप्ता नेमका कधी जमा होणार याबद्दल उत्सुकता आहे.

चार महिन्यांचा कालावधी पूर्ण

पीएम किसान योजनेचे हप्ते साधारणपणे चार महिन्यांच्या अंतराने जारी केले जातात. मागचा हप्ता जूनमध्ये मिळाल्यावर ऑक्टोबरमध्ये चार महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यामुळे २४ वा हप्ता ऑक्टोबरमध्ये जारी होऊ शकतो, अशी शक्यता आहे.

मात्र, महत्त्वाची बाब म्हणजे २४ व्या हप्त्याची तारीख केंद्र सरकारने अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवरही सध्या या हप्त्याच्या निश्चित तारखेबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

शेतकऱ्यांना मिळणार २ हजार रुपये

२४ वा हप्ता जारी झाल्यावर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा केली जातील. मात्र, त्यासाठी लाभार्थ्यांनी योजनेतल्या आवश्यक प्रोसेस आणि पात्रता पूर्ण केलेली असणं गरजेचं आहे.

सरकारकडून हप्ता जारी करण्याची तारीख साधारणरणे काही दिवस आधी जाहीर केली जाते. त्यामुळे येत्या काळात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अपडेट तपासावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ‘नेहरूंचा उदो-उदो करा, पण बाबासाहेबांचे अवमूल्यन करू नका’; भाई गिरकरांचा अभिजीत दिपकेंवर निशाणा

Black and White: ‘जैनांची नगरी’ म्हणालो, पण...; नरेंद्र मेहतांचं Exclusive मुलाखतीत स्पष्टीकरण; नेमकं काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लान, १०० विद्यामान आमदारांचे पत्ते कट होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Boiler Explosion : कारखान्यात अचानक बॉयलर फुटला; ५ जणांचा जागीच मृत्यू, अनेक कामगार अडकल्याची भीती?

LPG Cylinder : दिवाळीपूर्वी या सरकारचा मोठा निर्णय! १ गॅस सिलिंडर मिळणार फ्री; काय आहेत नियम?

SCROLL FOR NEXT