PM Kisan Samman Nidhi Yojana saam tv
बिझनेस

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ₹२००० साठी आताच करा हे काम, अन्यथा २२वा हप्ता विसरा

PM Kisan Yojana 22nd Installment Date: पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता देण्यात आला होता. या योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुमच्याकडे फार्मर आयडी असणे गरजेचे आहे.

Siddhi Hande

पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

२२वा हप्ता कधी येणार?

पुढच्या महिन्यात येऊ शकतात ₹२०००

२०२६ मध्ये अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. वर्ष सुरु झाल्यानंतर आता पीएम किसान योजनेचा लाभ कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. पीएम किसानच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत २१ हप्ते देण्यात आले आहेत. दरम्यान, आता २२ वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. आता २२वा हप्ता देण्यासाठी काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जर तुम्ही या गोष्टी केल्या नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.

फार्मर आयडी नसेल तर मिळणार नाही लाभ

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी असणे गरजेचे आहे. फार्मर आयडीशिवाय योजनेअंतर्गत २००० रुपये दिले जाणार नाही. दरम्यान, आतापर्यंत काही राज्यातच फार्मर आयडी अनिवार्य केले आहे. भविष्यात देशभरात फार्मर आयडी अनिवार्य केले जाईल. त्यामुळे जर तुम्ही अजूनही फार्मर आयडी काढले नसेल तर लवकरच करावेत.

फार्मर आयडी आहे तरी काय? (What is Farmer ID)

फार्मर आयडी हे यूनिक डिजिटल ओळखपत्र आहे. हे आयडी आधार कार्डला जोडलेले असते. राज्यातील जमिनीच्या रेकॉर्डच्या सिस्टीममध्ये याची नोंद असते. जर तुमच्या जमिनीच्या रेकॉर्डमध्ये काही बदल असेल तर फार्मर आयडीद्वारे लगेच करु शकतात.

केवायसी करणे गरजेचे

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी करणे अनिवार्य आहे. जर केवायसी केले नाही तर योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने केवायसी करु शकतात. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन हे काम करु शकतात.

पीएम किसानचा लाभ कधी मिळणार? (PM Kisan Yojana 22nd Installment Date)

पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता पुढच्या महिन्यात दिला जाऊ शकतात. फेब्रुवारी ते मार्च २०२६ मध्ये हप्ता दिला जाऊ शकतो. दरम्यान, आता याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला

Marriage Line in Palmistry: लग्न कधी होणार, कसा मिळेल पार्टनर? हातावरील ही रेषा देते महत्त्वाचे संकेत!

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT