PM Kisan Samman Nidhi Yojana saam tv
बिझनेस

PM Kisan Yojana : फेब्रुवारी की मार्च? पीएम किसानचा २२वा हप्ता कधी येणार? नवीन अपडेट आली समोर

PM Kisan Yojana 22nd Installment Date: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना २२ वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान फेब्रुवारीत शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार

या दिवशी येऊ शकतो २२वा हप्ता

पीएम किसानचा हप्ता मिळवण्यासाठी या गोष्टी करा

देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत.पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. दर तीन महिन्यांनी २००० रुपये दिले जातात. दरम्यान, आता या योजनेत शेतकरी २२व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. हा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

शेतकऱ्यांना योजनेचा पुढचा हप्ता मिळवण्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तुम्हाला यासाठी काही अटी पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.

या दिवशी येऊ शकतात पैसे (PM Kisan Yojana 22nd Installment May Come On These Date)

शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात पीएम किसानचा २२ वा हप्ता मिळू शकतो. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. याआधी ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात दिला होता. त्यानंतर ४ महिन्यांनी म्हणजेच फेब्रुवारीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात.

हे काम आताच करा

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ईकेवायसी करणे गरजेचे आहे. याचसोबत तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. याचसोबत तुमची सर्व माहिती ही योग्य असायला हवी. जर तुमची माहिती खरी नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे.

पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने वेबसाइटवर जाऊन केवायसी करायची आहे. यासाठी सिंपल प्रोसेस फॉलो करा. दरम्यान, तुम्ही ऑफलाइन पद्धतीने जवळच्या सीएससी केंद्रात जाऊनदेखील केवायसी करु शकतात.दरम्यान, जर तुम्हाला पैसे आले नाही तर तुम्ही कृषी कार्यालयात जाऊन संपर्क करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Instant PAN Card : फक्त 5 मिनिटांत मिळणार पॅनकार्ड; सरकारची नवी झटपट सुविधा सुरू

Maharashtra Live News Update: त्र्यंबकेश्वर मंदिरातील VIP दर्शनसेवा बंद

Sangli : सौरऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली १२००० झाडांची कत्तल, गावकऱ्यांना ठेवलं अंधारात

Nagpur Crime : पबमध्ये पार्टीत राडा झाला, ५ जणांनी पहाटे बाहेर गाठले अन् रस्त्यावर हत्या केली

Gemini Yearly Horoscope 2026: प्रत्येक कामात यश, प्रगतीने मार्ग होणार खुले...; जाणून घ्या मिथुन राशींसाठी कसं असणार नवं वर्ष?

SCROLL FOR NEXT