PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM Kisan योजनेची रक्कम ८००० रुपये होणार? अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता

PM Kisan Sanman Nidhi Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. २०२५ च्या अर्थसंकल्पात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वाढण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या वर्षात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढू शकते. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सध्या ६००० रुपये मिळतात. ही रक्कम ८००० रुपये केली जाऊ शकते. पीएम किसान सन्मान निधी योजनेतील रक्कम वाढवावी, अशी मागणी देशातील शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे येत्या काळात ही रक्कम वाढवली जाऊ शकते. (PM Kisan Sanman Nidhi Yojana)

१ फेब्रुवारी २०२५ ला होणाऱ्या अंतरिम बजेटमध्ये ही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. २०२५ मधील बजेट हे मोदी सरकारचे तिसरे बजेट असेल.या बजेटनमध्ये अनेक घोषणा करण्याची शक्यता आहे.

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच सांगितले होते की, पीएम किसान योजनेला जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहचवायचे आहे. त्यांनी पैसे वाढवणार असल्याचे सांगितले नव्हते. परंतु कदाचित या नवीन अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली जाऊ शकते. सरकार सध्या शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये देते. परंतु वर्षाला ८००० देण्याचा विचार सरकार करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत १८ वा हप्ता देण्यात आला होता. त्यानंतर शेतकरी १९ व्या हप्त्याची वाट पाहत आहे. हा हप्त फेब्रुवारी २०२५ मध्ये येऊ शकतो. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करणे हे यामागचे मुख्य उद्देश आहे. एक्सपर्ट्सनुसार, महागाई आणि शेतीतील वाढत्या खर्चामुळे या योजनेतील रक्कम वाढवायला हवी.या योजनेत जर सरकारने रक्कम वाढवली तर तर शेतकऱ्यांना खूप दिलासा मिळणार आहे. (PM kisan Sanman Nidhi Scheme Installment)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्षपदाचा निर्णय झाला का? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं, VIDEO

Maharashtra Live News Update: अपघातात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाचे शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतले शैक्षणिक पालकत्वं

Monday Horoscope: कामाचा ताण वाढेल, 5 राशी होणार मालामाल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Hair Fall: केसांच्या वाढण्यासाठी 'हा' बेस्ट होममेड हेअर मास्क नक्की ट्राय करा, केस गळती होईल कमी

KDMCमध्ये बॅनर वॉर; राजकारणातील 'बाजीगर'; शिंदेंनी भाजपला डिवचलं

SCROLL FOR NEXT