PM Kisan Mandhan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Mandhan Yojana: शेतकऱ्यांना दर महिन्याला ३००० रुपयांची पेन्शन; पीएम किसान मानधन योजना नक्की आहे तरी काय?

PM Kisan Mandhan Yojana For Farmers: सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान मानधन योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत गरीब शेतकऱ्यांना दर महिन्याला ३००० रुपये मिळणार आहेत.

Siddhi Hande

सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील काही योजना या महिला, शेतकरी आणि स्टार्टअपसाठी आहेत. देशातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान योजना राबवली आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील शेतकऱ्यांना दर महिन्याला पेन्शन दिले जाते. या योजनेला नुकतीच पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत लहान आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना दर महिन्याला आर्थिक मदत केली जाते. वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना दर महिन्याला ३००० रुपये निवृत्ती वेतन दिले जाते. म्हणजेच वर्षाला ३६,००० रुपये शेतकऱ्यांना दिले जातात.

पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत १८ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या योजनेत शेतकऱ्यांना दर महिन्याला ५५ ते २०० रुपये भरावे लागतात. ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत हे पैसे भरावे लागतात. वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना ३००० रुपये पेन्शन मिळते. (PM Kisan Mandhan Yojana)

२०१९ त्या नोंदणीप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत लागवडयोग्य जमीन असलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आतापर्यंत २३.३८ लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेतून दर महिन्याला मिळणारी ठरावीक रक्कम दिली जाते. त्यामुळे वयोवृद्ध शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते.

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकरी त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएसी) ला भेट देऊ शकतात. तसेच www.pmkmy.gov.in या वेबसाइटवरुन अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT