PM Kisan FPO Yojana Saam Tv
बिझनेस

Scheme For Farmers : सरकारची बळीराजासाठी मोठी योजना! व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्याला तब्बल १५ लाखांची मदत

PM Kisan FPO Yojana: पीएम किसान सन्मान निधी योजनेनंतर सरकारने पीएम किसान एफपीओ योजना सुरु केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना स्टार्टअप सुरु करण्यासाठी १५ लाख रुपयांचे लोन दिले जाते.

Siddhi Hande

भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्या ही शेती करते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते. सरकारने आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी.

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नागरिकांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात.त्यानंतर आता सरकारने शेतकऱ्यांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. सरकारच्या पीएम किसान एफपीओ योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी १५ लाखांची मदत केली जाते.

भारत सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पीएम किसान एफपीओ योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार ११ शेतकऱ्यांच्या गटाला शेतीशीसंबंधित स्टार्टअप सुरु करण्यासाठी मदत केली जाते. पीएम किसान फार्मर प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन असं या योजनेचं नाव आहे. या योजनेत स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी १५ लाखांची मदत केली जाते.

या योजनेअंतर्गत सरकार फार्मर प्रोड्यूसर ऑर्गनायझेशनच्या मदतीने शेतीसंबंधित व्यवसायांना मदत करते. या योजनेअंतर्गत जर कोणत्याही एका शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही. तर ११ शेतकऱ्यांच्या गटाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. (PM Kisan FPO Yojana)

या योजनेअंतर्गत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतो. या योजनेअंतर्गत https://www.enam.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतो. त्यानंतर होमपेजवर रजिस्ट्रेशन करुन लॉग इन करावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती द्यावी लागणार आहे आणि फॉर्म सबमिट करावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaata Marathi Movie: गरिबी, संघर्ष आणि मुलीचं स्वप्न; 'भाटा'मधून उलघडणार एका बापाची प्रेरणादायी गोष्ट

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

SCROLL FOR NEXT