pm kisan update meta ai
बिझनेस

PM Kisan Yojana: रक्षाबंधनाला शेतकऱ्यांच्या खात्यात ₹4,000 येणार? नेमकं सत्य काय?

Fact Check : रक्षाबंधनाला पीएम किसानचा २४ वा हप्ता आणि चार हजार रुपये मिळणार असल्याचा दावा व्हायरल झाला. PIB Fact Check ने हा AI बनावट व्हिडीओ असल्याचं स्पष्ट केलं असून अधिकृत घोषणा झालेली नाही.

Sakshi Sunil Jadhav

PM Kisan Yojana: पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २४व्या हप्त्याची देशभरातली शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार रुपये जमा केले जातील, असा दावा करण्यात आला आहे. मात्र या दाव्याबाबत सरकारने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिलं आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय दावा?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या हप्त्याच्या माध्यमातून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ४ हजार रुपये मिळतील, असा दावा व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ पाहून अनेक शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र सरकारकडून अद्याप २४ व्या हप्त्याच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

PIB Fact Check ने सांगितलं सत्य

सरकारची अधिकृत तथ्य पडताळणी संस्था PIB Fact Check ने हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट केलं आहे. PIB Fact Check नुसार सोशल मीडियावर फिरणारा हा व्हिडीओ AIच्या मदतीने तयार करण्यात आलेला बनावट व्हिडीओ आहे. सरकारने रक्षाबंधनाच्या निमित्ताने पीएम किसान योजनेअंतर्गत ४ हजार रुपयांचा हप्ता देण्याची कोणतीही घोषणा केलेली नाही.

२३ वा हप्ता कधी जमा झाला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते PM-KISAN योजनेचा २३ वा हप्ता २० जून २०२६ रोजी जारी करण्यात आला होता. आता शेतकऱ्यांचे लक्ष २४ व्या हप्त्याकडे लागलं आहे. मात्र त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. PIB Fact Check ने नागरिकांना अशा भ्रामक आणि सनसनाटी व्हिडीओवर विश्वास न ठेवण्याचे आणि ते पुढे फॉरवर्ड न करण्याचे आवाहन केले आहे. केंद्र सरकारच्या योजनांशी संबंधित कोणतीही माहिती मिळाल्यास ती अधिकृत सरकारी स्रोतांवरून तपासणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Land Record: आता तुमच्या जमिनीचेही असणार आधारकार्ड; नकाशा, नोंदणी अन् कोर्ट केसची माहिती मिळणार एकाच ठिकाणी

पानटपरीच्या आड भलताच धंदा; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबईतील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर, आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, बाळंतिणीला झोळीचा आसरा

Health Tips : खूप उशीर एकाच जागी बसल्याने शरीरात काय बदल होतात?

निधीमुळे अडले, आमदार मंत्र्यांसमोरच रडले, निधीवाटपावरून भाजप-शिंदेसेनेत पुन्हा संघर्ष

SCROLL FOR NEXT