PF Withdrawal Rules 2026 meta ai
बिझनेस

PF Withdrawal Rules 2026: PF मध्ये पैसे आहेत, पण लगेच काढता येणार नाहीत? 12 महिने ते 36 महिन्यांचा नवा नियम काय? जाणून घ्या...

EPFO New Rules: नोकरी सोडल्यानंतर पीएफ कधी काढता येईल? EPF साठी १२ महिने, EPS साठी ३६ महिने प्रतीक्षा, ७५7% विड्रॉल आणि २५% शिल्लक ठेवण्याच्या नियमांची जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Sakshi Sunil Jadhav

प्रत्येक नोकरी करणारी व्यक्ती तिच्या पगारातला काही टक्के भाग पीएफमध्ये साठवून ठेवत असते. त्याने भविष्यात आर्थिक अडचणींच्या वेळेस त्याला फायदा होतो. त्यामुळे पीएफ काढण्याच्या नियमांकडे कर्मचाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण नुकतेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पीएफमधून पैसे काढण्याच्या नियमात महत्त्वाचे केले आहेत.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना २०२६ अंतर्गत नोकरी सोडल्यानंतर संपूर्ण PF रक्कम काढण्यासाठी तसेच EPS म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजनेतील विड्रॉल बेनिफिटसाठी वेटिंग पीरियड निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पीएफ कधी आणि किती काढता येईल, याबाबत जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

EPF ची संपूर्ण रक्कम काढण्यासाठी १२ महिन्यांचा कालावधी

सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, नोकरी सोडल्यानंतर लगेच संपूर्ण EPF बॅलन्सचा अंतिम सेटलमेंट करता येणार नाही. यासाठी १२ महिन्यांचा वेटिंग पीरियड ठेवण्यात आला आहे.

EPS मधून पैसे काढण्यासाठी ३६ महिन्यांची प्रतीक्षा

EPS अंतर्गत विड्रॉल बेनिफिट घेण्यासाठी ३६ महिन्यांचा वेटिंग पीरियड लागू करण्यात आला आहे. त्यामुळे EPS मधली रक्कम काढण्यासाठी पात्र सदस्यांना ठरलेल्या कालावधी पूर्ण होण्याची वाट पाहावी लागेल.

पीएफमधून पैसे कधी काढू शकता?

वेटिंग पीरियड असला तरी कर्मचाऱ्यांना PF मधून आंशिक किंवा अॅडव्हान्स रक्कम काढण्याची सुविधा सुरू राहणार आहे. आवश्यक गरजा, घराशी संबंधित खर्च आणि विशेष परिस्थिती अशा तीन प्रमुख श्रेणींमध्ये PF काढता येईल.

वर्षातून दोन वेळा ७५% पर्यंत विड्रॉल

गरजेच्या वेळेस EPFO सदस्य वर्षातून दोन वेळा PF बॅलन्सच्या ७५% पर्यंत रक्कम काढू शकतात. यासाठी काही परिस्थितींमध्ये कारण सांगण्याची आवश्यकता नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र लागू नियम आणि पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक असेल.

२५% रक्कम खात्यात ठेवणे महत्त्वाचे

नव्या नियमांनुसार PF खात्यात किमान २५% रक्कम शिल्लक ठेवण्याची अट देखील चर्चेत आहे. त्यामुळे संपूर्ण PF बॅलन्स काढण्यावर मर्यादा राहणार आहे. हे बदल EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) २३८ व्या बैठकीत चर्चेनंतर पुढे नेण्यात आले. CBT मध्ये कर्मचारी संघटना, नियोक्ता आणि सरकारचे प्रतिनिधी सहभागी असतात.

EPFO कडून नवीन नियमांची माहिती सदस्यांपर्यंत पोहोचवणे, तक्रारींचे निराकरण मजबूत करणे आणि डिजिटल क्लेम सेटलमेंट जलद करण्यावरही भर दिला जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी PF काढण्यापूर्वी लागू नियम आणि आपली पात्रता तपासणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT