PF withdrawal Steps google
बिझनेस

PF Withdrawal Process: कामाची बातमी! PF चे पैसे झटक्यात काढा, UPI नं थेट बँक खात्यात येणार, फक्त ३ सोप्या स्टेप्स करा फॉलो

EPFO 3.0 Update: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अंतर्गत तुम्हाला तुमचा पीएफ तुमच्या थेट खात्यावर घरबसल्या मिळू शकतो. शिवाय याची प्रोसेसही एकमद सोपी आहे.

Sakshi Sunil Jadhav

कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. प्रत्येक नागरिक हा आपल्या पगारातली काही रक्कम शिल्लक ठेवतो. ही रक्कम PFमध्ये ठेवली जाते. त्याने भविष्यात अडचणीच्या वेळेस किंवा रिटायरमेंटनंतर तुम्हाला तुमचे पैसे वापरता येतात. पुर्वी हे पैसे काढण्यासाठी तुम्हाला बरेच दिवस बॅंकेच्या लांबच्या लांब रांगा लावाव्या लागत होत्या. पण आता EPFO 3.O च्या अंतर्गत तुम्हाला नवीन डिजीटल पद्धतीने तुमच्या पगाराचे पैसे खात्यात जमा करता येतील.

तुम्हाला आधी तुमचा PF काढण्यासाठी बॅंकेच्या सतत फेऱ्या माराव्या लागत होत्या. आता तुम्ही घरबसल्या फक्त ३ स्टेप्समध्ये हे काम पूर्ण करू शकता. या प्रोसेसने कुठेही न जाता तुम्हाला तुमचे बॅंक खात्यात आलेले दिसतील. तुम्ही हे पैसे UPIच्या मदतीने काढू शकता.

तुम्हाला पुर्वी EPFO पोर्टलवर Claim टाकणं गरजेचं होतं. त्यात पीफचे पैसे खात्यात यायलाही बरेच दिवस पाट पाहावी लागायची. पण आता तुम्ही UPI च्या नव्या प्रणालीनुसार गुगल पे, फोनपे आणि पेटीएमच्या मदतीने हे पैसे कमी कालावधीत तुमच्या बॅंक खात्यावर पाठवून घेऊ शकता.

UPIच्या मदतीने PF चे पैसे काढण्याच्या ३ सोप्या स्टेप

स्टेप 1

सर्वप्रथम तुम्ही तुमचा UAN क्रमांक आणि पासवर्ड वापरून EPFO ​​पोर्टल किंवा UMANG ॲपवर लॉग इन करून घ्या. मग तुम्हाला KYC आणि बँकेची माहिती भरावी लागेल. इथेच तुम्हाला तुमचा UPI आयडी लिंक करण्याचा ऑप्शन मिळेल.

स्टेप 2

आती PF Withdrawal या Claim या पर्यायावर क्लिक करा. तिथे तुम्हाला काढायची असलेली रक्कम निवडा. त्यानंतर तुम्हाला तुमचा UPI आयडी टाकावा लागेल आणि OTP किंवा वेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करावी लागेल.

स्टेप 3

वेरिफिकेशन आणि अप्रुवल प्रोसेस पूर्ण झाल्यावर, PFची रक्कम थेट तुमच्या UPI-लिंक केलेल्या बँक खात्यात पाठवली जाईल. याचा अर्थ, ही रक्कम तुम्ही Google Pay, PhonePe, Paytm किंवा इतर UPI ॲप्सशी जोडलेल्या तुमच्या खात्यात त्वरित पोहोचू शकते. जरी EPFO ​​ने आत्तापर्यंत कोणतंही अधिकृत ॲप जाहीर केलं नाही. त्यामुळे चुकीच्या ठिकाणी तुमची ही माहिती देणं टाळा आणि अधिकृत वेबसाईटचा वापर करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारने २ वर्षीय श्रृतिकाला चिरडलं, डॉक्टरविरोधात गुन्हा; थरारक VIDEO समोर

Maharashtra News Live Update: रायगडच्या दरी-डोंगरांत धबधबे प्रवाहीत; पर्यटनाला सुरुवात

Live Location Sharing : WhatsApp, Instagram वर तुम्हीही शोधू शकता मित्रांचे लाइव्ह लोकेशन; जाणून घ्या या सोप्या ट्रिक्स

Hindu Temple Tradition: मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पायऱ्यांचा आशीर्वाद का घेतला जातो?

शिवसेनेच्या नेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू; संशय आल्याने राऊत रुग्णालयात धडकले, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT