नोकरी बदलताना नवीन कंपनी, चांगला पगार आणि करिअरची संधी याकडे अनेकांचं लक्ष असतं. पण जुन्या कंपनीत जमा झालेल्या पीएफ आणि पेन्शनचं काय होणार, हा प्रश्न अनेकांना पडतो. जुना पीएफ काढता येतो का? नवीन कंपनीत परत खातं सुरू होतं का? पेन्शनची आधीची नोकरी मोजली जाते का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण योग्य वेळी पीएफ ट्रान्सफर केल्यावर तुमची बचत आणि पेन्शनची सेवा दोन्ही सुरक्षित राहू शकतात.
तुम्ही नोकरी बदलल्यानंतर नवीन UAN काढण्याची गरज नसते. तुमचा UAN (Universal Account Number) संपूर्ण नोकरीच्या काळात एकच राहतो. नवीन कंपनीला जुनाच UAN द्यायचा असतो. त्यानंतर नवीन कंपनी त्याच UAN अंतर्गत नवीन पीएफ Member ID तयार करते.
जुन्या कंपनीतल्या पीएफची रक्कम नवीन कंपनीच्या पीएफ खात्यात ऑनलाइन ट्रान्सफर करता येते. यासाठी EPFO पोर्टलवर ऑनलाइन ट्रान्सफर क्लेमची सुविधा मिळेल. त्यामुळे जुन्या खात्यातली बचत नवीन खात्यात जमा करता येईल. जानेवारी २०२५ मध्ये EPFO ने पीएफ ट्रान्सफरची प्रोसेस जास्त सोपी केली.
PF आणि पेन्शन एकच नसतात. पीएफमध्ये कर्मचारी आणि कंपनीचं योगदान जमा होतं. तर पेन्शन EPS (Employee Pension Scheme) अंंतर्गत मिळते. नोकरी बदलल्यावर ही रक्कम सामान्य पीएफसारखीच ट्रान्सफर होत नाही. त्याऐवजी जुन्या नोकरीचा पेन्शन सेवा कालावधी नवीन नोकरीच्या रेकॉर्डशी जोडला जातो.
नवीन कंपनी EPF अंतर्गत येत असेल, तर जुन्या पीएफ काढण्याऐवजी ट्रान्सफर करणं फायदेशीर ठरू शकतं. यामुळे बचत आणि पेन्शनची सेवा पुढे सुरू राहते. नोकरी बदलताना UAN, KYC, Date of Exit आणि पीएफ ट्रान्सफर स्टेटस नक्की तपासा. त्यामुळे भविष्यात पेन्शन आणि पीएफ मिळवताना अडचणी येणार नाहीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.