EPFO, PF Wage Ceiling, EDLI Insurance 
बिझनेस

PF च्या नवीन निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची चांदी! कुटुंबाला मिळणार विम्याचे दुप्पट पैसे

EPFO wage ceiling increase from 15000 to 25000 : EPFO ची वेतन मर्यादा १५ हजारांवरून २५ हजार रुपये होण्याची शक्यता आहे. यामुळे PF बचतीसोबत EDLI विमा संरक्षणातही वाढ होऊ शकते. जाणून घ्या संपूर्ण गणित.

Namdeo Kumbhar

EPFO, PF Wage Ceiling, EDLI Insurance : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO च्या सदस्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने पीएफची अनिवार्य बेसिक पगार मर्यादा १५,००० रुपयांवरून २५,००० रुपये प्रतिमहिना करण्याच्या निर्णय घेता आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

सरकारच्या या एका निर्णयामुळे केवळ कर्मचाऱ्यांचा निवृत्ती फंडच वाढणार नाही, तर त्यांच्या पाठीमागे कुटुंबाला मिळणाऱ्या मोफत जीवन विम्याच्या रकमेतही (EDLI Scheme) थेट दुप्पट वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या कर्मचाऱ्याच्या अकस्मात मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला कमाल ७ लाख रुपयांपर्यंतचा (EDLI Insurance) विमा मिळतो. मात्र, नवीन २५,००० रुपयांच्या पगार मर्यादेच्या गणितानुसार, हे कमाल विमा कव्हर आता वाढून १०.५० लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

विमा संरक्षणात कशी होणार वाढ? जाणून घ्या सविस्तर गणित

केंद्र सरकारने ईपीएफओची (EPFO) अनिवार्य बेसिक पगार मर्यादा (Wage Ceiling) १५,००० रुपयांवरून २५,००० रुपये प्रतिमहिना केल्यास, 'कर्मचारी ठेव संलग्न विमा योजने'अंतर्गत (EDLI Scheme) मिळणाऱ्या मोफत जीवन विमा संरक्षणात मोठी वाढ होऊ शकते. सेवेत असताना ईपीएफ (EPF) सदस्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, त्याच्या वारसाला (Nominee) किमान २.५ लाख रुपये तर कमाल ७ लाख रुपये इतकी विमा रक्कम मिळते. पण पगार मर्यादा २५,००० रुपये झाल्यास, ही कमाल विमा रक्कम वाढून १०.५० लाख रुपये (किंवा त्याहून अधिक) होण्याची शक्यता आहे.

EDLI योजनेअंतर्गत विम्याची रक्कम ठरवण्यासाठी खालील सूत्र वापरले जाते:

(मागील १२ महिन्यांचे सरासरी बेसिक वेतन × ३५ पट) + (मागील १२ महिन्यांच्या सरासरी EPF शिलकीच्या ५०% रक्कम - कमाल १.७५ लाख रु.)

१५,००० रु. मर्यादेनुसार (सध्याचे गणित):

१५,००० रु. × ३५ = ५.२५ लाख रु.

५.२५ लाख रु. + १.७५ लाख रु. (अतिरिक्त कव्हर) = एकूण ७ लाख रुपये

२५,००० रु. मर्यादेनुसार (संभाव्य गणित):

२५,००० रु. × ३५ = ८.७५ लाख रु.

८.७५ लाख रु. + १.७५ लाख रु. (अतिरिक्त कव्हर) = एकूण १०.५० लाख रुपये

(टीप: ही आकडेवारी संभाव्य गणितावर आधारित असून अंतिम निर्णय EPFO घेईल.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Facebook मध्ये होणार मोठा बदल! App उघडताच दिसणार रिल्स व्हिडिओ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी खासदारांसह जंतरमंतरकडे निघाले

Rajpal Yadav : सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांसमोर भावूक झाला राजपाल यादव, आता काय म्हणाला?

Health Care : ओव्हरथिंक करून वैतागलात का? 6 उपाय करा, आजूबाजूला दुःख फिरकणारही नाही

Car on 20000 salary: दरमहा 20 हजार रुपये पगार असेल तर कोणती कार घेण्याचा विचार कराल?

SCROLL FOR NEXT