EPFO Update  meta ai
बिझनेस

PF Rules 2026 : PF चे नियम बदलले! १५ ऑक्टोबरपासून CTC आणि टेक-होम सॅलरीत मोठे फेरबदल, पाहा तुम्हाला फायदा होणार की तोटा?

EPFO Update : ऑक्टोबर २०२६ पासून EPFO वेज सीलिंग २५,००० रुपये झाल्याने काही कर्मचाऱ्यांचे पीएफ योगदान वाढण्याची शक्यता आहे.

Sakshi Sunil Jadhav

ईपीएफओच्या नव्या वेज सीलिंगमुळे ऑक्टोबर २०२६ पासून काही पगारदार कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लिपमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. नव्या नियमांतर्गत २५,०००ची वेज सीलिंग लागू होणार असल्याने, ज्यांचा बेसिक आणि DA १५,००० पेक्षा जास्त आहे आणि आतापर्यंत १५,०००च्या मर्यादेवर पीएफ कपात होत होती. त्यांच्या टेक-होम सॅलरिवर परिणाम होऊ शकतो.

₹२० हजार बेसिक असल्यास किती फरक पडेल?

समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक + DA २०,००० इतका आहे. सध्या १५,०००च्या वेज सीलिंगनुसार कर्मचाऱ्याच्या पगारातून १,८०० PF कापला जातो. तर नव्या २५,०००च्या मर्यादेनुसार योगदान झाल्यामुळे ही रक्कम २,४०० होऊ शकते. म्हणजेच दर महिन्याला टेक-होम सॅलरी ६०० रुपयांनी कमी होईल. मात्र हे पैसे गमावले जाणार नाहीत. जास्त रक्कम कर्मचाऱ्याच्या PF खात्यात जमा होईल. त्यामुळे हातात येणारा पगार कमी झाला तरी भविष्यातली बचत वाढू शकते.

२५ हजार PF वेज असेल तर?

जर पीएफ वेज २५,००० रुपये असेल, तर कर्मचाऱ्याच्या PF हिस्सा ३,००० होऊ शकतो. म्हणजे जुन्या १५,००० रुपयांच्या मर्यादेच्या तुलनेत दर महिन्याला १,२०० रुपये जास्त पीएमध्ये जमा होतील.

CTC वर काय परिणाम होईल?

महत्त्वाची बाब म्हणजे PF ठरवण्यासाठी CTC हा थेट कायदेशीर आधार नाही. PF लागू वेतन आणि संबंधित नियमांनुसार योगदान ठरवलं जातं. त्यामुळे कंपनीला तिच्या वैधानिक PF योगदानाचा हिस्सा सरसकट कर्मचाऱ्याच्या पगारातून वसूल करता येत नाही. मात्र, कंपनीच्या एकूण वेतन खर्चानुसार CTC स्ट्रक्चरमध्ये बदल होऊ शकतो.

कोणाला जास्त लक्ष द्यावे लागेल?

ज्यांचा बेसिक + DA १५,००० रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांनी ऑक्टोबरची सॅलरी स्लिप तपासायला हवी. HRकडून PF वेज, कर्मचारी योगदान, कंपनीचे योगदान आणि CTCमध्ये झालेला बदल समजून घ्यावा. नवीन कपातीमुळे टेक-होम सॅलरी कमी झाली आहे का, हे जुन्या सॅलरी स्लिपशी तुलना करून पाहणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये उन्हाचा तडाखा वाढला; तापमानाचा पारा 35 अंशांवर

Dinner Skip: १५ दिवस डिनर टाळलं तर वजन खरंच कमी होतं का? शरीरात होणारे ७ बदल जाणून घ्या

IND vs PAK Final: पाकिस्तान चारीमुंड्या चीत! भारताचा सुवर्णवेध, अभिषेक-तिलक चमकले

5 Best Anarkali Sets: गरब्यासाठी घागरा- चोळी नाही? मग आजच खरेदी करा घेरदार अनारकली सूट

Health Care: शरीराला आतून हळूहळू नुकसान पोहोचवतात 'या' ७ सवयी; आजच बदला तुमची लाइफस्टाइल

SCROLL FOR NEXT