Petrol Diesel Rate  Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेलचे भाव स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Petrol Diesel Price 5th July 2024: पेट्रोल डिझेलच्या किंमतीत रोज चढ-उतार होताना दिसत आहे. रोज सकाळी पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती जाहीर होत असतात. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर.

Siddhi Hande

राज्यात रोज पेट्रोल डिझेलचे नवे भाव जाहीर होत असतात. जर तुम्ही कुठे फिरायला जात असाल तर तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव नक्की चेक करा. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होत आहेत. पेट्रोल डिझेलचे भाव हे कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव बदलत असतात.

रोज सकाळी इंधन कंपन्या पेट्रोल डिझेलचे भाव जाहीर करत असतात. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले आहे. इंधनावरील व्हॅट कर कमी केल्यामुळे पेट्रोलची किंमत ६५ पैशांनी कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात WTI क्रूड ऑइल ८३.४५ डॉलरवर विकले जात आहे तर ब्रेंट क्रूड ऑइल ८६.७३ डॉलर प्रति बॅलरवर विकले जात आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७६ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ८७.६६ रुपये आहे. मुंबईत पेट्रोल १०३.४३ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ८९.९५ रुपये आहे. कोलकत्यात पेट्रोलचा दर १०४.९३ रुपये आहे तर डिझेलचा दर ९१.७५ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर १००.७३ रुपये आहे तर डिझेलचा दर ९२.३२ रुपये प्रति लिटर आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर

पुण्यात पेट्रोल १०३.७६ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.३० रुपये प्रति लिटर आहे. ठाण्यात पेट्रोलची किंमत १०३.५१ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९०.०३ रुपये आहे. नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत १०४.७५ रुपये आहे तर डिझेल ९१.२६ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०३.९६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.५२ रुपये प्रति लिटर आहे.अहमदनगरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.७६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.२६ रुपये आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.३४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.८६ रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: कामात संधी, आनंदाची बातमी; या 5 राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा बुधवारचं राशीभविष्य

मनसेच्या कार्यालयात तुंबळ हाणामारी; राऊत यांना बेदम मारहाण, तालुकाध्यक्षावरही हल्ला

Chakan MIDC: चाकण MIDCमध्ये जीवघेणे खड्डे, वर्षभरात ३९९ जणांचा बळी, जबाबदार कोण?

Health Tips: चालताना पायाचे तळवे का दुखतात? काय आहेत कारणं?

Fake Police Fraud: खाकी वर्दीला भ्रष्टाचाराचा विळखा, पोलीस दलात वेतन घोटाळा; बोगस पोलिसांच्या नावे कोट्यवधींवर डल्ला

SCROLL FOR NEXT