Petrol-Diesel Maharashtra Rate Today  Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Price: महाराष्ट्रात आजपासून पेट्रोल-डिझेल स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर...

Petrol-Diesel Rate Today: इंधनाच्या दरात कपात करण्यात आल्याने कोणत्या शहरात, किती रुपयांना पेट्रोल-डिझेल मिळणार हे जाणून घेऊयात...

Satish Daud

Petrol-Diesel Maharashtra Rate Today

महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने इंधनाच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी २ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलचे दर कमी होताच तेल कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार मुंबईत आज सकाळी ६ वाजेपासून पेट्रोलचा नवीन भाव १०४.१५ रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचा भाव ९२.१० रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ९४.९२ रुपये आणि ८७.६२ रुपये प्रति लिटर इतके आहे. (Latest Marathi News)

याआधी राज्य सरकारने जुलै २०२२ मध्ये  पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) दरात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेलचे दर ३ रुपये प्रति लिटरने कमी करण्यात आले होते. दरम्यान, आता पुन्हा इंधनाच्या दरात कपात करण्यात आल्याने कोणत्या शहरात, किती रुपयांना पेट्रोल-डिझेल मिळणार हे जाणून घेऊयात...

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा भाव काय?

  • मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर १०४.१५ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर हे ९२.१० रुपये प्रति लिटर आहेत.

  • पुण्यामध्ये आज पेट्रोलच्या किंमती १०३.८४ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९०.७१ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

  • नाशिकमध्ये आज पेट्रोलची १०४.१८ रुपये प्रति लिटरने विक्री होतेय. तर डिझेल ९०.४१ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०४.०४ रुपये आणि डिझेलची किंमत ९०.६३ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०५.२१ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९१.५७ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

  • अहमदनगरात पेट्रोलच्या किंमती या १०३.९६ रुपये प्रति लिटर अशा आहेत. डिझेलच्या किंमती ९१.४१ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT