Petrol Diesel Price Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price: मुंबई पुण्यासह महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर;एक लिटर इंधनाचे भाव काय?

Petrol Diesel Price Today 27th August 2024: देशभरात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर.

Siddhi Hande

देशभरात रोज सकाळी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले जातात.पेट्रोल डिझेलच्या भावात गेल्या अनेक दिवसांपासून बदल झालेले नाही. पेट्रोल डिझेलचे भाव हे शहरानुसार बदलतात. सध्या प्रत्येक घरात एकतरी वाहन हे असतात. वाहन असल्यावर तुम्हाला पेट्रोल डिझेलचा खर्च करावाच लागतो. पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर असल्याने नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे.

राज्यात पेट्रोल डिझेलचे भाव हे शहरानुसार बदलतात.पेट्रोल डिझेलच्या भावावर व्हॅट दर लादला जातो. व्हॅट दरामुळे देशातील पेट्रोल डिझेलचे वाढले आहेत. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबईत पेट्रोलची किंमत १०३.४४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये आहे. पुण्यात पेट्रोल १०४.०३ रुपयांवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.८२ रुपये आहे. नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत १०४.४८ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१ रुपये आहे. नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०३.९८ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.५४ रुपये आहे.कोल्हापूरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.०३ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.६० रुपये आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.४७ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.९९ रुपये आहे.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

नवी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७२ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०४.९५ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलची किंमत १००.८५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९२.४३ रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT