Petrol Diesel Price Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पेट्रोल डिझेल स्वस्त की महाग? वाचा एका क्लिकवर

Petrol Diesel Price Today 24th August 2024: देशभरात आज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर.

Siddhi Hande

देशभरात रोज सकाळी पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर करतात.पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या पेट्रोल डिझेलच्या भावानुसार शहरातील इंधनाचे भाव ठरवले जातात. पेट्रोल डिझेलचे भाव शहरानुसार बदलत असतात. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

पेट्रोल डिझेलचे भाव हे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमती वाढलेल्या आहेत.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर

मुंबईत पेट्रोलची किंमत १०३.४४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये आहे.पुण्यात पेट्रोल १०४.५३ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे. तर डिझेलची किंमत ९१.०४ रुपये आहे. नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत १०४.४० रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.९२ रुपये आहे. नागपूरमध्ये पेट्रोल १०३.९९ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.५५ रुपये आहे.कोल्हापूरमध्ये पेट्रोल १०४.६७ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९१.२१ रुपये आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोल १०५.२६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.७५ रुपये आहे.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

नवी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७२ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलची किंमत १००.८५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९२.४३ रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT