Personal Loan Saam Tv
बिझनेस

Personal Loan: उठसूठ कोणत्याही गोष्टीसाठी लोन घेताय? तज्ज्ञांनी नेमकं काय काय सांगितलं वाचाच

Personal Loan Guidance: सध्या पर्सनल लोन घेण्याचे प्रमाण वाढत आहे. अनेक वैयक्तिक कारणांसाठी पर्सनल लोन घेतले जाते. दरम्यान, पर्सनल लोन घेतल्याने फायदा होतो. कोणत्या कारणांसाठी पर्सनल लोन वापरले जाते हे जाणून घ्या.

Siddhi Hande

सध्या प्रत्येकजण आपल्या भविष्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात. त्याचसोबत बदलत्या काळानुसार जीवनशैलीदेखील बदलते. या परिस्थितीत लाइफस्टाइलनुसार जगण्यासाठी अनेकांना आर्थिक गरज भासते. अशा परिस्थितीत अनेकजण पर्सनल लोन काढतात. सध्या पर्सनल लोन काढण्याचे प्रमाण वाढत आहे. फक्त आप्तकालीन परिस्थिती नव्हे तर अनेक कारणांसाठी पर्सनल लोन काढले जाते.

व्यक्तीगत कर्ज घ्यायची ती केवळ 'आणीबाणीच्या परिस्थिती’त हा विचार भारतात हळूहळू बदलत चालली आहे. स्थिर नोकऱ्या आणि व्यवस्थित पगार असलेल्या उपभोक्तावर्गामध्ये हे स्थित्यंतर विशेषत्वाने दिसत आहे. अनेक वर्षांपासून आर्थिक शिस्त पाळत आलेल्या, दीर्घकालीन बचत उभी करत असलेल्या आणि सातत्याने गुंतवणूक करत असलेल्या वर्गामध्ये हा बदल दिसून आला आहे.

विशेषत: कोविड काळानंतर त्यांची गुंतवणूक करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला नसला तरी 'पैसा गुंतवण्याची’ व्याख्या मात्र खरोखर बदलली आहे. आर्थिक भवितव्यासाठी योग्य ती काळजी घेतली जात असली तरी आरोग्य, मन आणि शरीर यांच्यासाठी आवश्यक गुंतवणूकीकडे नकळतच दुर्लक्ष झाल्याचे अनेकांच्या लक्षात आले. त्यानंतरच्या काळात हे आकलन अधिक पक्के होत गेले आहे, कारण कामाच्या दृष्टीने अत्यंत व्यग्र आयुष्य आणि वेगवान दिनक्रम यांमध्‍ये स्वास्थ्य जपणे, स्वत:ची काळजी घेणे किंवा आयुष्याचा दर्जा सुधारणे यांसारख्या गोष्टींकडे लोक आता स्वत:चे लाड पुरवणे म्हणून बघत नाहीत तर आवश्यक बाबी म्हणून बघू लागले आहेत.

परिणामी आजचे कर्जदार अधिक स्पष्टतेने आणि हेतूपूर्वक खर्च करू लागले आहेत. स्वास्थ्य, शिक्षण, अर्थपूर्ण अनुभव, घराची आरामदायकता आणि व्यक्तिगत इच्छाआकांक्षा या दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या उद्दिष्टांना त्यांच्याकडून आता प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. मात्र कष्टाने उभ्या केलेल्या गुंतवणूका या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी वापरण्याची त्यांची इच्छा नाही. ते हप्ते भरण्यास सक्षम आहेत आणि त्यांचे एसआयपी, दीर्घकालीन पोर्टफोलिओ व निवृत्तीनंतरच्या काळासाठी केलेल्या तरतूदींना धक्का न लावता त्यांना अन्य उद्दिष्टांसाठी खर्च करायचा आहे.

या परिस्थितीत व्यक्तीगत कर्ज हा व्यवहार पर्याय ठरतो. हप्त्याचा (ईएमआय) आकडा माहीत असेल तर तो वजा करून दैनंदिन खर्चांचे नियोजन करता येते आणि दीर्घकालीन गुंतवणूकींना हात न लावता त्या सुरू ठेवता येतात. थोडक्यात, ‘स्वप्नपूर्ती’साठी कर्ज काढण्याबाबतची पारंपरिक कल्पना आता नव्याने केली जाऊ लागली आहे:

पर्सनल लोनचा वापर कशासाठी करतात.

ग्राहकांमध्ये विस्तृत 'जीवनविषयक गुंतवणुकीं’साठी व्यक्तीगत कर्जांचा वापर करण्याचे प्रचलन वाढत आहे, यात आकांक्षा आणि स्वास्थ्य यांचा मेळ साधलेला दिसतो: केवळ प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घेण्याच्या पलीकडील उपक्रमाभिमुख अनुभवाधारित प्रवासासाठी व्यक्तीगत कर्जे घेतली जात आहेत; निसर्गाचे सान्निध्य, शांतता, ध्यानधारणा व डिजिटल साधनांपासून दूर राहणे अशा पद्धतीने विकसित केलेल्या 'वेलनेस रिट्रीट्स’चा अनुभव घेण्यासाठी व्यक्तीगत कर्जे घेतली जात आहेत; त्वचेवरील उपचार, केसाचे प्रत्यारोपण व निवडक सौंदर्योपचार प्रक्रिया यांसारख्या आत्मविश्वास वाढवणाऱ्या पण अनेक वर्षांपासून पुढे ढकलल्या जाणाऱ्या स्वत:ची काळजी घेण्याच्या पद्धतींसाठी व्यक्तीगत कर्जे घेतली जात आहे. याशिवाय शिक्षण व कौशल्यविकास तसेच घराचे आरामदायीत्व वाढवणे, घरातील दुरुस्त्या यांवर हेतूपूर्वक केल्या जाणाऱ्या खर्चात स्पष्ट वाढ दिसून येत आहे. ज्यात वेळ अत्यंत महत्त्वाची असते अशा आयुष्यांतील महत्त्वाच्या क्षणांवर, मग ते लग्नसोहळे असोत, कौटुंबिक सोहळे असोत किंवा महत्त्वाचे उत्सव असोत, खर्च करण्यासाठी व्यक्तीगत कर्ज काढण्याचे प्रमाण वाढले आहे.

व्यक्तीगत कर्जांचा उपयोग दैनंदिन आर्थिक नियोजनासाठीही केला जात आहे. अनेक ग्राहक या कर्जांचा वापर सर्व देय रकमा एका ठिकाणी आणण्यासाठीही (डेट कन्सॉलिडेशन) करत आहेत, त्यामुळे सर्व निश्चित खर्च एका हप्त्यामध्ये सामावले जातात, आर्थिक बाबींवर आपले नियंत्रण वाढते आणि मन:शांतीही मिळते. काही जण व्यक्तीगत कर्जाचा वापर वाहनाशी निगडित पैशाची तफावत भरून काढण्यासाठी तसेच पुढे न ढकलता येणाऱ्या अत्यावश्यक सुधारणांसाठी करतात.

आत्मविश्वास वाढण्यामागील कारणे

व्यक्तीगत कर्ज समजून घेण्यासाठी व नियोजनासाठी अधिक सोपे असते:

• कर्जाच्या अटी व शुल्के अधिक स्पष्ट व पारदर्शक असतात.

• वितरण अधिक वेगाने होते, हे कर्ज उपलब्ध होण्यासाठी अधिक सोपे असते.

• हप्त्यांची रचना सुलभ असल्याने त्यानुसार आर्थिक नियोजन करणे सोपे जाते.

• डिजिटल प्रवासामुळे ग्राहकांना स्वत:च्या सोयीने प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा मिळते.

"आम्हाला आत्मविश्वासपूर्ण स्थित्यंतर दिसत आहे: उत्तम उत्पन्न आणि शिस्तबद्ध गुंतवणूक सवयी असलेले ग्राहक स्वास्थ्य, आयुष्यातील अनुभव व दीर्घकाळापासून पूर्ण न झालेल्या आकांक्षा आदी अर्थपूर्ण उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी दीर्घकालीन गुंतवणूक न मोडता, व्यक्तीगत कर्जाचा उपयोग करत आहेत. कोविड साथीनंतर अनेक जण स्वत:ची काळजी घेणे व दीर्घकाळ बाळगलेली स्वप्ने पूर्ण करणे या गोष्टींना प्राधान्य देऊ लागले आहेत, या गोष्टींकडे आता चैन म्हणून बघितले जात नाही. अशा ग्राहकांसाठी कोटक पर्सनल लोन्स हा सहज पर्याय ठरत आहे. शिस्तीने उभ्या केलेल्या दीर्घकालीन गुंतवणूका थांबवणे किंवा मोडणे टाळण्यासाठी ते कर्ज काढत आहेत. व्यक्तीगत कर्जामुळे त्यांना वर्तमानकाळ भरभरून जगण्यात आणि त्याच वेळी भविष्यकाळातील नियोजन सुरक्षित राखण्यात मदत होत आहे,” असे कोटक महिंद्रा बँकेच्या पर्सनल लोन्स विभागाचे व्यवसाय प्रमुख अमित पाठक म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

45 दिवसांनंतर मिळणार सिलेंडर? गॅस टंचाईमुळे सरकारने नियम बदलला?

Maharashtra Live News Update: हिंगोलीत नागरिकांनी घेतला पेट्रोल पंपचा ताबा

इराणचा इस्त्रायलवर भीषण हल्ला, इस्त्रायलवर तासाला 10 क्षेपणास्त्रांचा मारा

Thursday horoscope : कुटुंबातील जुने वाद मिटतील, नोकरीत प्रमोशन मिळणार; ५ राशींच्या लोकांचा गोल्डन टाइम सुरू होणार

Bus Accident : पद्मा नदीवर भीषण अपघात, ४० जणांना घेऊन जाणारी बस कोसळली

SCROLL FOR NEXT