Personal Loan EMI meta ai
बिझनेस

Personal Loan EMI: पर्सनल लोन घेतलंय? व्याजाचा बोजा कमी करण्यासाठी हे 5 उपाय नक्की करा

Personal Loan Repayment : पर्सनल लोन लवकर फेडबन व्याजाची बचत करायची असेल तर पार्ट-पेमेंट, EMI कायम ठेवून कालावधी कमी करणं, बोनस वापरणं आणि फोरक्लोजर शुल्क तपासणे महत्त्वाचे आहे.

Sakshi Sunil Jadhav

पर्सनल लोन घेताना दर महिन्याला ठराविक EMI भरायची असते. मात्र, लोनचा कालावधी जितका जास्त तितके एकूण व्याजही जास्त द्यावे लागते. त्यामुळे नियोजन करून लोनचे मूळ कर्ज लवकर कमी केल्यावर मोठी व्याजबचत होऊ शकते.

समजा, तुम्ही ₹5 लाखांचे पर्सनल लोन 12 टक्के वार्षिक व्याजदराने 5 वर्षांसाठी घेतले. अशा कर्जाचा EMI ₹11,122 होतो. 60 महिने EMI भरल्याने एकूण ₹6.67 लाखांची रक्कम जमा होईल.

1. पार्ट- पेमेंट करा : नियमित EMI व्यतिरिक्त एकरकमी रक्कम भरून मूळ कर्ज कमी करता येतं. उदाहरणार्थ 12 EMI भरल्यानंतर ₹1 लाख पार्ट- पेमेंट केल्यावर ₹4.22 लाखांचं थकीत मूळ कर्ज कमी होऊन जवळपास ₹3.22 लाख राहू शकतं.

2. EMI कमी न करता कालावधी कमी करा: पार्ट-पेमेंटनंतर EMI शक्य तितकी कायम ठेवून लोनचा कालावधी कमी करणे जास्त फायदेशीर ठरू शकतं. दिलेल्या उदाहरणात लोन 47 महिन्यांत संपून जवळपास ₹45,000 व्याजाची बचत होऊ शकते.

3. बोनस किंवा इन्सेंटिव्हचा वापर करा: बोनस, इन्सेंटिव्ह किंवा इतर एकरकमी उत्पन्नाचा काही भाग पार्ट-पेमेंटसाठी वापरल्याने थकीत मूळ रक्कम वेगाने कमी करता येते.

4. वर्षातून एकदा अतिरिक्त रक्कम भरा: मोठी रक्कम उपलब्ध नसली तरी वर्षातून एकदा आपल्या क्षमतेनुसार अतिरिक्त रक्कम, अगदी एका EMIएवढी रक्कमही, कर्जात जमा करता येते.

5. फोरक्लोजरपूर्वी शुल्क तपासा:लोन पूर्ण बंद करण्याआधी बँकेचं प्रीपेमेंट किंवा फोरक्लोजर चार्जेस तपासा. व्याजातून होणारी बचत आणि लागणारे शुल्क यांची तुलना करणं महत्त्वाचे आहे. तसेच लोन फेडताना आपत्कालीन गरजांसाठी पुरेशी बचत शिल्लक राहतेय का, हेही पाहा.

थोडक्यात, पर्सनल लोन लवकर फेडताना फक्त EMI कमी करण्याऐवजी मूळ रक्कम कमी करणं, कालावधी कमी करणं आणि अतिरिक्त शुल्क तपासणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दिवाळीआधीच खात्यात ₹२,००० जमा होणार, सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर

Maharashtra News Live Update: ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारी उल्हास नदी प्रदूषणाच्या विळख्यात

ड्रायव्हिंग लायसन्सचा नियम बदलला! पास होण्यासाठी ६० नव्हे तर ७५% गुण पाडावेच लागणार, केंद्र सरकारचा मोठा प्रस्ताव

Water Cut Alert : कल्याण-डोंबिवलीकरांनो पाणी जपून वापरा! मंगळवारी नळाला थेंबही पाणी येणार नाही; 'या' भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

Black Tongue: जीभ काळी का पडते? तज्ज्ञांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT