Pension Update 2026 saam tv
बिझनेस

Life Certificate 2026 : पेन्शनधारकांनो सावधान! 30 नोव्हेंबरपूर्वी हे काम करा, अन्यथा खात्यात पैसे येणार नाहीत

Pension Update 2026: पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ३० नोव्हेंबरआधी लाइफ सर्टिफिकेट जमा करा.

Sakshi Sunil Jadhav

देशातल्या पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला दर महिन्याला नियमित पेन्शन हवी असेल, तर लाइफ सर्टिफिकेट म्हणजेच जीवन प्रमाणपत्र वेळेत जमा करणं आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र जमा करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर आहे. त्यामुळे पेन्शनधारकांकडे आता हे काम पूर्ण करण्यासाठी फक्त १५ दिवस शिल्लक आहेत. वेळेत प्रमाणपत्र जमा न केल्याने पेन्शनच्या रकमेत अडथळा येऊ शकतो.

लाइफ सर्टिफिकेट जमा करणं का महत्त्वाचं?

सरकार दरवर्षी पेन्शनधारकांकडून जीवन प्रमाणपत्र मागतं. संबंधित व्यक्ती हयात आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी ही प्रोसेस केली जाते. यामुळे चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात पेन्शन जमा होण्याचा धोका टाळता येतो. त्यामुळे प्रत्येक पात्र पेन्शनधारकाने वेळेत जीवन प्रमाणपत्र जमा करणं गरजेचं आहे. प्रमाणपत्र जमा केलं नाही तर पेन्शनचे पैसे थांबवले जाऊ शकतात.

घरबसल्या कसं जमा कराल लाइफ सर्टिफिकेट?

पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी बँकेच्या रांगेत उभं राहण्याची गरज नाही. यासाठी तीन सोपे पर्याय उपलब्ध आहेत.

1. स्मार्टफोनवरून फेस ऑथेंटिकेशन

स्मार्टफोनच्या मदतीने UMANG ॲपवरील फेस ऑथेंटिकेशन सुविधेचा वापर करून डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार करता येतं. मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर चेहरा स्कॅन करून ही प्रोसेस पूर्ण करता येते.

2. पोस्टमन घरी येणार

स्मार्टफोन वापरताना जर काही अडचण आल्या तर इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या (IPPB) डोअरस्टेप बँकिंग सुविधेचा लाभ तुम्हाला घेता येईल. यासाठी पोस्टमन घरी येऊन डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करायला मदत करेल. तुम्ही इतर माहितीसाठी 033-22029000 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता.

3. बँक किंवा CSC केंद्रात सुविधा

ऑनलाइन प्रक्रिया शक्य नसेल तर जवळच्या बँक शाखेत, संबंधित EPFO कार्यालयात किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने जीवन प्रमाणपत्र जमा करता येतं.

पेन्शनधारकांनी काय लक्षात ठेवावे?

शेवटच्या तारखेची वाट पाहू नका. आवश्यक कागदपत्रांसह जीवन प्रमाणपत्राची प्रोसेस लवकर पूर्ण करा. वेळेत प्रमाणपत्र जमा केल्याने पेन्शनच्या वितरणात अडथळे येण्याची शक्यता टाळता येईल.

पनीर फ्रिजमध्ये ठेवायचा की बाहेर? साठवण्याची योग्य कोणती?

Maharashtra News Live Update: वेकोलीविरोधात संजय खाडे आक्रमक; भूमिपुत्रांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा

Accident: कामगारांना घेऊन जाणारी बस महामार्गावर उलटली, १२ जणांचा जागीच मृत्यू

'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स'वरून नवा वाद! रूपाली चाकणकर आक्रमक, ३ दिवसांपासून सेन्सॉर बोर्डात फेऱ्या

Kitchen Hacks : फ्रिजमध्ये ठेवूनही कोंथिंबीर सुकतेय? 'या' टिप्सनं कोथिंबीर राहील हिरवीगार

SCROLL FOR NEXT