Pan Card Link Aadhar Card Saam TV
बिझनेस

Pan Card Link Aadhar Card : पॅनकार्ड वापणाऱ्यांकडे आता फक्त २ दिवस शिल्लक; आजच 'हे' काम न केल्यास होईल मोठं नुकसान

Pan Link Aadhar Card Before 31 May 2024 : पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करण्यासाठी आयकर विभागाने एक नोटीस जाहीर केलं आहे. त्यानुसार शेवटची तारीख ३१ मे २०२४ आहे.

Ruchika Jadhav

आयकर विभागाने आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी नवीन अधिसूचना जाहीर केली आहे. करदात्याने दिलेल्या तारखेपर्यंत आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास दुप्पट टीडीएस भरावा लागणार आहे. यासाठी ३१ मे ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे दुप्पट टीडीएसपासून वाचण्यासाठी आजच ही प्रोसेस पूर्ण करणे आवश्यक आहे.

फक्त २ दिवस शिल्लक

पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करणे गरजेचे आहे. पुढील सर्व आर्थिक कामांमध्ये याची गरज भासणार आहे. त्यासाठी आयकर विभागाने या आधी देखील तारीख वाढवून दिली होती. मात्र अनेक व्यक्तींनी ही कामे पूर्ण न केल्याने तारीख पुन्हा वाढवण्यात आली. त्यामुळे दंड भरावा लागू नये यासाठी तुम्ही आजच पॅनकार्ड आधारकार्डला लिंक केले पाहिजे. आता यासाठी फक्त २ दिवस शिल्लक आहेत.

असे करा लिंक

आधारकार्ड पॅनकार्डला लिंक करणे फार सोप्प आहे.

त्यासाठी आधी आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या संकेत स्थळाला भेट द्या.

पुढे 'Quick Links' वर क्लिक केल्यानंतर 'Link Aadhaar' हा पर्याय निवडा.

पुढे पॅनकार्ड आणि आधारकार्डवरील क्रमांक टाका. त्यानंतर वॅलिडीटीवर क्लिक करा.

पुढे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकल्यावर लिंक आधारवर क्लिक करा.

मोबाईल नंबरवरील ओटीपी आल्यावर तो प्रविष्ट करा. त्यानंतर तुमचं आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक होईल.

पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करण्यासाठी आयकर विभागाने एक नोटीस जाहीर केलं आहे. त्यानुसार शेवटची तारीख ३१ मे २०२४ आहे. या तारखेनंतर ज्या व्यक्ती आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करतील त्यांना दुप्पट टीडीएस भरावा लागेल असं स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळे या २ दिवसांत तुम्ही आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक न केल्यास तुम्हाला दुप्पट टीडीएस भरावा लागू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert: गणरायाच्या आगमनासोबत राज्यात पावसाने जोर पकडला, हवामान खात्याकडून अलर्ट जारी; कोणत्या जिल्ह्यांना झोडपून काढणार?

Maharashtra News Live Update: मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक

Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

Monday Horoscope: गणरायाचे आगमन अन् 'या' ३ राशींचे नशीब चमकणार; धनलाभासोबत मिळेल मोठी खुशखबर!

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

SCROLL FOR NEXT