OPPO FIND X9 WITH 200MP CAMERA LAUNCH IN INDIA ₹99 PRE-BOOKING OFFER saam tv
बिझनेस

Oppo Find X9: भारतात २०० एमपी कॅमेरासह 'हा' नवीन फोन होणार लाँच, कंपनीने दिली ९९ रुपयांची खास ऑफर

Oppo India Launch: Oppo Find X9 सिरीज लवकरच लाँच होणार आहे, ज्यात स्टँडर्ड आणि प्रो व्हर्जनसह दोन शक्तिशाली फोन Find X9 आणि Find X9 Pro यांचा समावेश आहे.

Dhanshri Shintre

Oppo ने आपल्या पुढील स्मार्टफोन मालिकेची भारतातील लाँचिंग तारीख जाहीर केली आहे. Oppo Find X9 सीरीज १८ नोव्हेंबर रोजी भारतीय बाजारात सादर होणार असून या मालिकेत Oppo Find X9 आणि Find X9 Pro हे दोन स्मार्टफोन असतील. ही सीरीज आधीच चीनमध्ये लाँच झाली आहे आणि ती आता भारतीय यूजर्ससाठी उपलब्ध होणार आहे.

या नवीन Find X9 मालिकेत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. जो हॅसलब्लॅडच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे. हॅसलब्लॅड ब्रँडिंगसह येणाऱ्या या कॅमेरा सिस्टीममध्ये प्रो मॉडेलमध्ये २०० मेगापिक्सेलचा प्रमुख सेन्सर असणार आहे. दोन्ही डिव्हाइस अँड्रॉइड १६ वर आधारित कलरओएस १६ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतील, म्हणजेच नवीनतम सॉफ्टवेअर अनुभव यूजर्सना मिळेल.

कंपनीने लाँचिंगपूर्वी ₹९९ मध्ये एक आकर्षक प्रिव्हिलेज पॅक जाहीर केला आहे. या पॅकमध्ये ₹१,००० चे एक्सचेंज कूपन, ८०W चा SUPERVOOC पॉवर अॅडॉप्टर आणि दोन वर्षांचा बॅटरी प्रोटेक्शन प्लॅन समाविष्ट आहे. हे फायदे फक्त ₹९९ अतिरिक्त किमतीत मिळतील.

स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, Oppo Find X9 मध्ये 6.59-इंचाचा OLED डिस्प्ले असेल, तर प्रो मॉडेलमध्ये 6.78-इंचाचा फ्लॅट OLED स्क्रीन दिला जाण्याची शक्यता आहे. दोन्ही डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 1.5K रिझोल्यूशनसह येतील. या दोन्ही फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ९५०० प्रोसेसर, १६ जीबीपर्यंत रॅम आणि १ टीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज असणार आहे.

कॅमेरा सेटअपबद्दल सांगायचे झाल्यास फाइंड एक्स९ मध्ये ५० मेगापिक्सेलचे तीन सेन्सर असतील, तर फाइंड एक्स९ प्रो मध्ये ५०MP + ५०MP + २००MP चा प्रगत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. दोन्ही मॉडेल्समध्ये ५० मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे. बॅटरीबाबत, Oppo Find X9 मध्ये ७०२५mAh आणि फाइंड एक्स९ प्रो मध्ये ७५००mAh क्षमतेची बॅटरी दिली जाईल, ज्यांना ८०W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळेल. Oppo Find X9 सीरीज लाँचिंगनंतर भारतीय प्रीमियम स्मार्टफोन बाजारात सॅमसंग आणि वनप्लस सारख्या ब्रँड्सना स्पर्धा देऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Atal Pension Yojana: या सरकारी योजनेत दर महिन्याला मिळते ₹५०००; गुंतवणूकीचं संपूर्ण कॅल्क्युलेशन वाचा

Vaidehi Parshurami Photos: लाल साडीत खुललंं वैदेही परशुरामीचं सौंदर्य, फोटो पाहा

Vande Bharat Train : मोठी बातमी! देशात आणखी ४ वंदे भारत ट्रेन सेवेत, जाणून घ्या तुमच्या शहरातून धावणार का?

SCROLL FOR NEXT