Online Shopping Charges meta ai
बिझनेस

Online Shopping Charges : ऑनलाइन वस्तू मागवण्याआधी हे वाचा! सप्टेंबरपासून डिलिव्हरी चार्ज वाढणार

Delivery Charges : 1 सप्टेंबरपासून Delhiveryच्या शिपिंग शुल्कात वाढ होणार आहे. एक्सप्रेस पार्सलवर ४ रुपये आणि सरफेस शिपमेंटवर २ रुपये जास्त शुल्क आकारलं जाणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

Online Shopping News: सणासुदीच्या दिवसांमध्ये ऑनलाइन शॉपिंग करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या १ सप्टेंबरपासून ऑनलाइन मागवलेल्या वस्तूंच्या डिलिव्हरीचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. लॉजिस्टिक्स कंपनी Delhivery ने डायरेक्ट टू कंज्यूमर (D2C) ब्रँड्ससाठी शिपिंग शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या दरांचा थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम पुढच्या दिवसांत उत्पादनांच्या किमतींवरही होऊ शकतो.

१ सप्टेंबरपासून किती वाढणार डिलिव्हरी चार्ज?

कंपनीने ग्राहकांना पाठवलेल्या ई-मेलनुसार, लॉजिस्टिक्स क्षेत्रातला खर्च सातत्याने वाढतोय. विमान इंधनाच्या किमती, ग्राउंड स्टाफचा खर्च आणि संपूर्ण लॉजिस्टिक्स नेटवर्कवरचा महागाईचा दबाव यामुळे कंपनीने शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या किमतीनुसार, एक्सप्रेस शिपमेंटवर प्रति पार्सल ४ रुपये तर सरफेस शिपमेंटवर २ रुपये जास्त शुल्क आकारलं जाणार आहे. यामध्ये ५०० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाच्या पार्सलसाठी डिलिव्हरी खर्चात ५ ते १० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे. हे अतिरिक्त शुल्क सध्याच्या Delhivery शिपिंग फीच्यावर आकारलं जाणार आहे. पार्सलचे वजन आणि ते कोणत्या अंतरावर पाठवले जात आहे, यावर डिलिव्हरीचा अंतिम खर्च अवलंबून असतो.

कोणत्या कंपन्यांवर होणार परिणाम?

Delhiveryच्या या निर्णयाचा सर्वात जास्त परिणाम D2C कंपन्यांवर होऊ शकतो. या कंपन्या पारंपरिक घाऊक विक्रेते, वितरक किंवा रिटेल स्टोअरचा वापर न करता थेट ग्राहकांना प्रोडक्ट विकतात. Mamaearth, boAt आणि Wakefit यांसारख्या कंपन्या या व्यवसाय मॉडलशी संबंधित आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Passport Rules 2026: पासपोर्टच्या नियमांत मोठा बदल! पासपोर्टची वैधता बदलली, शुल्कही वाढलं; जाणून घ्या नवे नियम

Maharashtra News Live Update: दुष्काळी मदतीसाठी स्वराज्य पक्ष आक्रमक

Eye Health: डोळ्यांमध्ये दिसतात 'हे' ५ बदल असू शकतात महत्त्वाचे; दुर्लक्ष करण्याआधी जाणून घ्या कारणं

तुकाराम मुंढेंच्या एफडीएची मोठी कारवाई, १२ लाखांचा गुटखा जप्त अन् १४ हॉटेल्सचे परवाने निलंबित

Stomach cancer: वारंवार पोटदुखी होतेय? पोटाच्या कॅन्सरची 'ही' लक्षणं ओळखा

SCROLL FOR NEXT