Old Pension Saam Digital
बिझनेस

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी गूड न्यूज! जुनी पेन्शन संदर्भात मोठा निर्णय, कुणाला होणार लागू? वाचा सविस्तर

Old Pension Scheme :सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! सीएसआयआरने पात्र कर्मचाऱ्यांना एनपीएसऐवजी जुनी पेन्शन योजना (OPS) निवडण्याचा पर्याय दिला आहे.

Namdeo Kumbhar

CSIR old pension scheme latest update : अनेक दिवसांपासून जुन्या पेन्शन योजनेची (OPS) वाट पाहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या एका मोठ्या निर्णयानंतर आता वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CSIR) आपल्या पात्र कर्मचाऱ्यांना 'नॅशनल पेन्शन सिस्टम' (NPS) सोडून पुन्हा 'जुनी पेन्शन योजना' (OPS) निवडण्याचा मोठा पर्याय दिला आहे.

हा निर्णय प्रामुख्याने अनुकंपा तत्त्वावर (Compassionate Appointment) रुजू झालेल्या त्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी १ जानेवारी २००४ पूर्वी नोकरीसाठी अर्ज केला होता, परंतु त्यांची नियुक्ती या तारखेनंतर झाली होती, त्यांना याचा लाभ मिळणार आहे. CSIR च्या या पावलामुळे आता इतर केंद्रीय स्वायत्त संस्थांमधील (Central Autonomous Bodies) कर्मचाऱ्यांसाठीही जुन्या पेन्शनचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारच्या जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात निर्णयाला आता वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CSIR) मंजुरी दिली आहे. यामुळे अनुकंपा नियुक्तीअंतर्गत नोकरीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनुकंपा नियुक्ती म्हणजे एखादा सरकारी कर्मचारी सेवेत असताना त्याचा मृत्यू झाल्यास अथवा त्याला कायमचे अपंगत्व आल्यास, त्याच्या कुटुंबातील अवलंबून असलेल्या सदस्याला आर्थिक मदत देण्यासाठी दिली जाणारी नोकरी होय.

पण जुनी पेन्शनसंदर्भातील हा निर्णय १ जानेवारी २००४ पूर्वी अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज केला होता, पण १ जानेवारी २००४ नंतर नोकरीवर रुजू झाले त्यांच्यासाठी लागू केला जाणार आहे. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) लागू झाल्यामुळे त्यांचा NPS अंतर्गत समावेश करण्यात आला होता. आता त्यांना दोन्हीपैकी एक पर्याय निवडता येणार आहे.

आता केंद्र सरकारने अशा पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसआयआरने ७ जुलै २०२६ रोजी जीआर जारी करत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या २२ जून २०२६ रोजीच्या पत्रानुसार हा निर्णय घेण्यात आला.

आधी मार्च २०२३ मध्ये केंद्र सरकारने अशा कर्मचाऱ्यांना ओपीएस (OPS) निवडण्याची एक संधी दिली होती. ज्यांची भरती प्रक्रिया १ जानेवारी २००४ पूर्वी सुरू झाली होती, पण नियुक्ती नंतर झाली होती. त्यावेळी अनुकंपा नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध नव्हती. आता ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Lakshmi Niwas: 'लक्ष्मी निवास'मध्ये मोठा ट्विस्ट! लक्ष्मी-श्रीनिवासचे घराचे स्वप्न पूर्ण; तर जयंतचा होणार अखेर पर्दाफाश

Weekly Insulin: भारतात नवं इन्सुलिन लाँच! रोज नाही तर आठवड्यातून एकदाच घ्या इंजेक्शन, किंमत किती?

पावसाळ्याचा फिरायला जायचा प्लॅन करताय? पण, मुंबई-पुण्याजवळील 'ही' प्रसिद्ध पर्यटनस्थळे ३१ ऑगस्टपर्यंत राहणार बंद

Today Gold Rate : सुवर्णनगरीत सोन्याला झळाळी, चांदीलाही चकाकी; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT