Old Pension Scheme meta ai
बिझनेस

Old Pension Scheme : जुनी पेन्शन मिळत नसल्याने शिक्षक आक्रमक! सरकारला दिला थेट इशारा, आता काय होणार?

Teachers Protest : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सोलापुरात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून मूकमोर्चा काढला.

Sakshi Sunil Jadhav

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सोलापुरातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. जुनी पेन्शन समन्वय संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मूकमोर्चात जिल्ह्यातल्या हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहकुटुंब सहभागी झाले. आंदोलकांनी तोंडावर काळ्या फिती बांधून शासनाचे लक्ष वेधले.

चार हुतात्मा पुतळ्यापासून सुरू झालेला हा मूकमोर्चा पूनम गेटच्या दिशेने निघाला. हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन शिक्षकांनी शासनाच्या धोरणाविरोधात आपली नाराजी व्यक्त केली. मोर्चानंतर पूनम गेट या ठिकाणी एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.

१ नोव्हेंबर २००५ आधी नियुक्त झालेल्या अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ च्या तरतुदीनुसार जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. यापैकी अनेक कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला अनुदानित किंवा विनाअनुदानित तत्त्वावर सेवा बजावली. त्यानंतर शासनाच्या अनुदान धोरणानुसार त्यांच्या संस्थांना अनुदान मिळाले; मात्र पेन्शनच्या बाबतीत त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

“सेवा १ नोव्हेंबर २००५ पूर्वीची, मग पेन्शनची तारीख वेगळी का?” असा सवाल उपस्थित करत शिक्षकांनी शासनाकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. बरीच वर्षे सेवा बजावल्यानंतर निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचेही आंदोलकांनी सांगितले. यावेळी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी सरकारला इशारा देताना, जुनी पेन्शनचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा पुन्हा हजारोंच्या संख्येने मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येईल, असे म्हटले.

शासनाने २५ सप्टेंबरपर्यंत सकारात्मक निर्णय न घेतल्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मागणी मान्य झाली नाही तर २८ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन, तर त्यानंतर २ ऑक्टोबरपासून उपोषण करण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Signs of dehydration: शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास पहिलं लक्षणं काय दिसून येतं?

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसींचे लाक्षणिक उपोषण

Flight Ticket Rate : कोकणवासियांसाठी मोठी खूशखबर! आता विमानाने करा स्वस्त अन् मस्त प्रवास; पाहा काय आहेत तिकिटाचे दर

Ganesh Chaturthi 2026: गणेशोत्सवापूर्वी घरातून बाहेर काढा 5 वस्तू; नकारात्मक उर्जा दूर होऊन घर होईल शुद्ध

Heart-Diabetes : डायबिटीज अन् हार्टच्या रुग्णांनी दिवसातून किती वेळा खावं? डॉक्टरांनी सांगितला खाण्याचा योग्य नियम

SCROLL FOR NEXT