NPS Vatsalya Yojana Saam Tv
बिझनेस

NPS Vatsalya Yojana: वर्षाला १००० रुपये गुंतवा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा; केंद्र सरकारची नवी योजना नक्की आहे तरी काय?

NPS Vatsalya Yojana For Childrens: अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी एनपीएस वात्सल्य योजनेची घोषणा केली आहे. एनपीएस वात्सल्य योजनेअंतर्गत लहान मुलांसाठी पालक खाते उघडू शकतात.

Siddhi Hande

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी NPS वात्सल्य योजना लाँच केली आहे. लहान मुलांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. NPS वात्सल्य योजनेत पालक मुलांसाठी पेन्शन योजनेत गुंतवणूक करु शकतात. मुलांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

पालक NPS वात्सल्य योजनेत ऑनलाइन, बँक किंवा पोस्ट ऑफिसला भेट देऊन गुंतवणूक करु शकतात. वात्सल्य खाते उघडण्यासाठी तुम्हाला किमान १००० रुपये योगदान द्यावे लागणार आहे. त्यानंतर दरवर्षी १,००० रुपयांचे योगदान द्यावे लागणार आहे.

मुलांच्या १८ वर्षांपर्यंत पालक या खात्यात गुंतवणूक करु शकणार आहेत. त्यानंतर हे खाते पुढे अखंडपणे सुरु ठेवण्यासाठी त्याचे एनपीएस खात्यात किंवा इतर कोणत्याही योजनेत रुपांतर करता येईल.त्यानंतर या खात्याचा वापर मुलगा करु शकणार आहे.

NPS वात्सल्य योजना निर्मला सितारामन यांनी सुरु केली आहे. एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, पेन्शन योजनांनी चांगला परतावा दिला आहे. भविष्यात नियमितपणे उत्पन्न मिळावे यासाठी गुंतवणूकीचा हा उत्तम पर्याय आहे. गेल्या दहा वर्षात NPS चे १.८६ कोटी सदस्य झाले आहेत. यातून कर्मचाऱ्यांना चांगला फायदा होत आहे.

NPS वात्सल्य योजना ही नॅशनल पेन्शन योजनेचा विस्तार आहे. यामध्ये १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी खाते उघडू शकतात. त्यानंतर १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही NPS खाते तयार करु शकतात. दरम्यान,NPS वात्सल्य योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यात निवृत्तीवेतनु हे ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतरच दिले जाईल.

या बँकामध्ये उघडू शकतात NPS वात्सल्य खाते

आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा, अॅक्सिस बँकसह अनेक बँकांमध्ये तुम्ही NPS वात्सल्य खाते उघडू शकतात. या योजनेत खाते उघडण्यासाठी मुलांच्या नावावर खाती नोंदणी करावी लागेल. त्यानंतर तुमच्या सोयीनुसार दरवर्षी पैसे जमा करावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : बाप लेकाचा स्वॅग न्यारा! दबंग स्टाइलमध्ये भाईजान बसला वडिलांच्या बाईकवर, पाहा PHOTO

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

Mankhurd Exit Poll: अबू आझमी की नवाब मलिक, मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

SCROLL FOR NEXT