LPG Connection Fees and Eligibility saam tv
बिझनेस

LPG Gas Connection : नवीन गॅस कनेक्शन घ्यायचंय? घरबसल्या करा ऑनलाइन अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

LPG Gas Connection Documents : नवीन LPG गॅस कनेक्शन घ्यायचं आहे? आता घरबसल्या ऑनलाइन अर्ज करा. वाचा सोपी प्रोसेस.

Sakshi Sunil Jadhav

तुम्ही जर शहर बदल दुसऱ्या शहरात राहत असाल तर नवीन LPG गॅस कनेक्शन लागतंच. पण त्यासाठी आधी सतत गॅस एजन्सीमध्ये फेऱ्या माराव्या लागायच्या. आता तुम्ही हे काम घरबसल्या ऑनलाइन अर्ज करून नवीन LPG कनेक्शन मिळवू शकता. इंडेन, भारत गॅस आणि HP गॅस या कंपन्यांकडून ग्राहकांना ऑनलाइन अर्जाची सुविधा मिळालेली आहे. यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आणि केवायसी प्रोसेस पूर्ण करावी लागते. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोफत गॅस कनेक्शनचाही लाभ मिळू शकतो. नवीन कनेक्शनसाठी अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रं लागतात आणि किती पैसे खर्च होतात, हे जाणून घेऊयात.

नवीन गॅस कनेक्शनसाठी पात्रता काय?

नवीन घरगुती LPG कनेक्शन घेण्यासाठी अर्जगदाराचं वय किमान १८ वर्षे असावं. तसेच अर्जदाराच्या घरात संबंधित तेल कंपनीचं दुसरं घरगुती LPG कनेक्शन नसावं. अर्जदाराकडे वैध ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे. तसेच संबंधित गॅस एजन्सीच्या सेवा क्षेत्रात राहणं आणि KYC प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे.

कोणती कागदपत्रे लागणार?

ऑनलाइन अर्ज करताना आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मोबाईल नंबर तयार ठेवा. गरजेनुसार पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, पासपोर्ट किंवा बँक खात्याचा तपशीलही मागितला जाऊ शकतो. कागदपत्रांची अंतिम यादी गॅस कंपनीच्या नियमांनुसार बदलू शकते.

नवीन गॅस कनेक्शनसाठी किती फी लागते?

नवीन कनेक्शन घेताना सिलिंडरची रक्कम, रेग्युलेटर, पहिला रिफिल, गॅस पाइप आणि लागू इंस्टॉलेशन शुल्क भरावं लागतं. गॅस शेगडी स्वतंत्रपणे खरेदी करावी लागू शकते. त्यामुळे एकूण खर्च सिलिंडरचा प्रकार, शहर आणि कंपनीच्या दरांनुसार ठरतो. अर्ज करण्यापूर्वी एजन्सीकडून शुल्काची संपूर्ण माहिती आणि अधिकृत पावती घ्या.

इंडेन गॅससाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

१. सर्वप्रथम इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइटवर(https://cx.indianoil.in/) जा.

२. नवीन LPG कनेक्शन किंवा New Connection हा ऑप्शन निवडा.

३. Indane Gas हा ऑप्शन निवडा.

४. नाव, मोबाईल नंबर आणि पत्त्याची माहिती भरा.

५. जवळची गॅस एजन्सी निवडा.

६. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून KYC प्रक्रिया पूर्ण करा.

७. अर्ज सबमिट करून संदर्भ क्रमांक त्यामध्ये टाका करा.

यानंतर गॅस एजन्सीकडून अर्जाची पडताळणी केली जाईल. अर्ज मंजूर झाल्यानंतर पेमेंट आणि कनेक्शन मिळण्याची पुढची प्रोसेस पूर्ण करता येईल. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातल्या पात्र महिलांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY 2.0) उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना ठरलेली रक्कम न भरता LPG कनेक्शन, पहिला रिफिल आणि शेगडीचा लाभ मिळू शकतो. यासाठी योजनेचे पात्रता निकष पूर्ण करणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्कादायक! पुण्यातील एअरहोस्टेसचा मृतदेह गोंदियाच्या जंगलात सापडला; नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: अजितदादांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला राष्ट्रवादीतले बडे नेते गैरहजर

Diljit Dosanjh: 'मी घाबरत नाही, कोणाच्या बापाचा हिंदुस्तान नाही' दिलजीत दोसांजचा कॉन्सर्टमध्ये धमकी देणाऱ्यांना सडेतोड इशारा!

Team India: रोहित-विराटचा न्यूझीलंडमधील शेवटचा वनडे सामना; चाहत्यांचे आभार मानताना दिग्गज भावूक, पाहा Video

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या एरियर्सचे पैसे एकरकमी मिळणार की हप्त्यांमध्ये? समोर आली अत्यंत महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT