NEET UG Exam Saam Tv
बिझनेस

NEET Exam: नीट परीक्षेबाबत मोठा निर्णय! आता पेपर-पेनच्या साहाय्याने होणार परीक्षा

NEET UG Exam Offline: नॅशनल टेस्ट एजन्सीने नीट परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता नीट परीक्षा पेपर आणि पेनच्या साहाय्याने घेण्यात येणार आहे.

Siddhi Hande

नीट-यूजी परीक्षा ही सर्वात अवघड परीक्षांपैकी एक आहे.वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी तुम्ही नीट परीक्षा द्यावी लागते. नीट परीक्षेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नीट परीक्षा आता पेपर-पेनच्या आधारे घेतली जाणार आहे. याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. (NEET UG Exam)

या निर्णयामुळे नीट-यूजी परीक्षा आता पेपरवर होणार आहे. केंद्रिय आरोग्य आणि शिक्षण खात्यांशी चर्चा केल्यानंतर ही घोषणा केली आहे. नीट यूजी परीक्षा ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पेन पेपरच्या साहाय्याने घ्यावी, याबाबत विचार केला आहे, अशी माहिती एनटीएने दिली आहे.

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी नीट परीक्षा घेते. त्यांनी याबाबत महत्त्वाची निर्णय घेतला आहे. एनटीएने सांगितले की, नीट यूजी परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. एकाच शिफ्टमध्ये पेन आणि पेपरच्या साहाय्याने ही परीक्षा घेतली जाईल, असा निर्णय घेतला आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी नीट परीक्षेला बसतात.

नीट यूजी आणि यूजीसी नेट परीक्षांबाबत गेल्या अनेक दिवसांपासून अनेक प्रश्न विचारले जात आहे. या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआय चौकशी करत आहे. या तपासाकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष आहे. (NEET UG Exam On Paper)

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर नीट परीक्षा द्यावी लागते. लाखो विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न असते. त्यांना ही परीक्षा द्यावी लागते. नीट परीक्षा ही ७२० गुणांची असते. ही परीक्षा क्रॅक करणे खूप अवघड असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

SCROLL FOR NEXT