Namo Shetkari Yojana saam tv
बिझनेस

Namo Shetkari Yojana : दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० येणार! नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Namo Shetkari 9th Installment : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कारण सरकार दिवाळीआधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ₹5,000 ची आर्थिक मदत करणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

Namo Shetkari Yojana 9th Installment: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीआधी ५,००० रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आल्याची माहिती आहे. दुसरीकडे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नवव्या हप्त्याची वाट शेतकरी अजूनही पाहतायेत. त्यामुळे आता त्यांच्या मनात दोन प्रश्न आहेत, ५ हजार रुपयांची मदत कोणाला मिळणार आणि नमो शेतकरी योजनेचे २ हजार रुपये खात्यात कधी जमा होणार?

दुष्काळग्रस्तांना मदत

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या २६५ वरून ३०५ झाल्याचं सांगितलं आहे. या भागामधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीआधी प्रत्येकी ५००० रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र ही मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान आणि पात्रता यांची पडताळणी महत्त्वाची ठरू शकते. सरकारकडून सर्वेक्षण सुरू असल्याची माहितीही देण्यात आली आहे. मदतीची अंतिम पात्रता, वितरणाची तारीख आणि आवश्यक कागदपत्रांसाठी अधिकृत सरकरी सूचना तपासणं गरजेचं आहे.

नमो शेतकरी योजनेचा ९वा हप्ता कधी येणार?

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६,००० रुपये दिले जातात. २,००० रुपये ही रक्कम दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते.

दिलेल्या माहितीनुसार, योजनेचा आठवा हप्ता मार्चमध्ये जमा झाला होता. त्यानंतर शेतकरी नवव्या हप्त्याची वाट पाहतायेत. मात्र नवव्या हप्त्याची निश्चित तारीख जाहीर झाल्याची पुष्टी उपलब्ध माहितीतून होत नाही. त्यामुळे पैसे नेमके कधी जमा होतील, याबद्दल अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वसतिगृहासाठी नंदुरबारमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा 20 किलोमीटरपर्यंत मोर्चा

Grey Colour Saree Designs For Women: नवरात्रीसाठी ग्रे कलरच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, महिलांनी नक्की ट्राय करा हे 5 पॅटर्न्स

Vijay Khairnar : मालेगावच्या चिमुकलीला अखेर न्याय! आरोपी विजय खैरनारला फाशीची शिक्षा

Morning Routine: सकाळच्या या १० सवयी लावून घ्या, दिवसभर राहाल ताजेतवाने...

Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसला भीषण अपघात, भरधाव ट्रकची समोरून धडक, ४ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT