Share Market Update  Saam Tv
बिझनेस

Multibagger Stock : २ रुपयांचा शेअर ४०० पार; १ लाखांची गुंतवणूक करणारे ४ वर्षात कोट्यधीश

Vishal Gangurde

Stock Market News:

शेअर बाजारात नेहमी चढ-उतार पाहायला मिळतात. मात्र, शेअर बाजारात असे काही शेअर आहेत, ते लोकांचं नशीब बदलतात. अशी एक माहिती समोर येत आहे. एका शेअरमध्ये लाँगटर्म गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. अशाच SG Finserve या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार अवघ्या चार वर्षात कोट्यधीश झाले आहेत.

४३० रुपयांपर्यंत अधिक झाली शेअरची किंमत

१९९४ मध्ये सुरु झालेल्या एसजी फिनसर्व्ह लिमिटेड ही कंपनी ब्रोकिंग, डिस्ट्रिब्यूटर्स, इन्वेस्टमेंटसहित फंड मॅनेजमेंट, इन्वेस्टमेंट बँकिंग आणि इन्शुरन्स सर्विसेज सारख्या सुविधा देते. गेल्या चार वर्षात या कंपनीचा २ रुपयांचा शेअर ४३० रुपयापर्यंत पोहोचला आहे. २७ मार्च २०२० रोजी या शेअरची किंमत २.८० रुपये इतकी होती. मंगळवारी या शेअरची किंमत ४३१.८० रुपयांपर्यंत पोहोचला.

१ लाख रुपये झाले १.५ कोटी रुपये

एसजी फिनसर्व्ह लिमिटेडचं मार्केट कॅपिटलायझेशन २२६० कोटी रुपये आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना १६००० टक्के परतावा दिला आहे. ४ वर्षांपूर्वी ज्यांनी एसजी फिनसर्व्ह शेअर २.८० दराने एक लाखांची गुंतवणूक केली असेल, त्यानंतर आजही कायम ठेवली असेल. तर त्या गुंतवणुकीची किंमत १.५ कोटी रुपये झालेली असेल.

गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न देणाऱ्या एसजी फिनसर्व्ह शेअरच्या कामगिरीवर नजर टाकली तर मागील पाच वर्षात शेअरची किंमत ४२८.८५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना १४,५३७ टक्के परतावा दिला आहे.

रॉकेटच्या वेगाने शेअरची तेजी

मार्च २०२० मध्ये या शेअरची किंमत २.८० रुपये इतकी होती. तर त्यानंतर २०२१ साली या शेअरची किंमत ५ रुपये इतकी झाली. त्यांनंतर त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात शेअरची किंमत ३० रुपयांपर्यंत पोहोचली. त्यानंतर शेअरची किंमतीत वाढ होतच राहिली. २६ मे २०२३ रोजी या शेअरची किंमत ७०० रुपयांपर्यंत पोहोचली होती. तर २ एप्रिल २०२४ रोजी या शेअरचा भाव ४३१.८० रुपयांवर बंद झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT