मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ केवायसीझाल्यामुळे बंद झालेल्या महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केवायसी पूर्ण झाली नाही म्हणून लाभापासून वंचित राहिलेल्या ८१ लाख महिलांना परत दरमहिन्याला १५०० रुपये देण्यात येतील, अशी हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती किसान सभेच्या शिष्टमंडळाने दिली आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अखिल भारतीय किसान सभेने शेतकरी आणि वेगवेगळ्या घटकांच्या मागण्यांसाठी अकोला ते मुंबई वाहन लाँग मार्च काढला होता. मंगळवारी शहरापूर येथे हा मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत जवळपास दोन तास बैठक झाली. या बैठकीत विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थी महिलांची केवायसी प्रोसेस सुरू ठेवण्यात आलेली आहे. त्यासाठी बंद झालेले पोर्टल परत सुरू करण्याबाबत सरकारकडून आश्वासन देण्यात आल्याचं वृत्त आहे. ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केलीये, पण त्यांना अजून पैसे मिळाले नाहीत, त्यांचा लाभही परत सुरू करण्याबाबक सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या या बैठकीत नमो शेतकरी महासन्मान निधीचे थकीत दोन हप्ते लवकर वितरित करण्याचं आश्वासन देण्यात आलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानात वाढ आणि पीक विम्याच्या प्रश्नांवरही चर्चा झाली. तसेच शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांची मानधनवाढ, बांधकाम कामगारांची मेडिक्लेम योजना आणि विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबतही आश्वासने देण्यात आली.
मान्य केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी ४ नोव्हेंबर रोजी परत बैठक होणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना केवायसी पोर्टल पुन्हा सुरू होण्याची आणि थकीत लाभ मिळण्याची प्रतीक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.