Ladki Bahin Yojana SAAM TV
बिझनेस

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना, तर इतर राज्यात काय? अर्ज कसा करावा? वाचा सविस्तर

Mukhyamantri Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' राबवली जात आहे. या योजनेप्रमाणेच इतर राज्यांमध्ये महिलांसाठी कोणत्या योजना राबवल्या जातात, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सध्या महाराष्ट्रातील अनेक महिला 'लाडकी बहीण योजना'चा (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) लाभ घेत आहेत. महाराष्ट्रात ही योजना एकनाथ शिंदे यांनी सुरू केली. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना सरकार दरमहा 1,500 रुपये देते. भारतातील इतर राज्यांमध्ये महिलांसाठी कोणत्या योजना राबवल्या जातात हे आपण आज जाणून घेऊयात. या योजनांसाठी अर्ज करायचा असल्यास याची सविस्तर माहिती तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर पाहायला मिळते.

लाडली बहना योजना - मध्यप्रदेश

मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 2023मध्ये 'लाडली बहना योजना' सुरू केली आहे. हे सरकार दरमहा महिलांच्या खात्यात 1250 रुपये देते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना - उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रींनी 'कन्या सुमंगला योजना' सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना 2000 रुपये दिले जातात. वयानुसार या रकमेत वाढ होते. या योजनेअंतर्गत जेव्हा मुलगी 10वी, 12वी उत्तीर्ण होते तेव्हा पदवी अभ्यासक्रमांसाठी तिला 5000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आर्थिक मदत मिळते.

मुख्यमंत्री राजश्री योजना - राजस्थान

राजस्थानमध्ये 'मुख्यमंत्री राजश्री योजना' राबवली जाते. या योजनेद्वारे मुलींना शिक्षणासाठी शासनाकडून आर्थिक मदत केली जाते. 1 जून 2016 नंतर जन्मलेल्या मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी 50,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT