Ladki Bahin Yojana SAAM TV
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला नाही? लगेच करा 'या' नंबरवर कॉल

Mukhyamantri Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. जर योजनेचे पैसे तुम्हाला आले नाही तर 'या' नंबरवर कॉल करा.

Shreya Maskar

'माझी लाडकी बहीण योजना' (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) अंतर्गत दर महिना पात्र महिलांना 1,500 रुपये दिले जातात. दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारकडून योजनेत समाविष्ट असलेल्या महिलांना चौथा आणि पाचवा हप्ता देण्यात आला. आता लाडक्या बहिणी सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहे.महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 'माझी लाडकी बहीण योजना' राबवली आहे.

'माझी लाडकी बहीण योजना' 2024 मध्ये सुरू करण्यात आली. 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत मिळते. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर मीडिया रिपोर्ट्सनुसार, 15 डिसेंबरनंतर सहावा हप्ता मिळेल असे बोले जात आहे. कारण नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात यासंबंधित निर्णय होण्याची शक्यता आहे.लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही अंगणवाडीतही भरू शकता.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे न आल्यास काय करावे?

  • लाडकी बहीणीने स्वतःचे नाव लाभार्थ्यांच्या लिस्टमध्ये आहे की नाही , ते पाहावे.

  • नाव लिस्टमध्ये नसल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा.

  • आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्यावे.

  • ऑनलाइन बँकींगच्या मदतीने खात्यात पैसे आले का, हे चेक करा.

  • जर यानंतरही तुम्हाला पैसे आलेच नसतील तर शेवटी 181 या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून तक्रार दाखल करा.

181 या हेल्पलाइन नंबरवर कॉल केल्यावर 'लाडकी बहीण योजने'चा अर्ज करूनही पैसे का आले नाही याची चौकशी करा. मिळालेल्या माहितीनुसार पुढे अपडेट व्हा. जानेवारी संपेपर्यंत जर लाडक्या बहीणींच्या बँकेत हप्ता जमा झाला. मात्र तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले नसतील तर या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून आपली तक्रार नोंदवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT