Government livestock scheme aims to boost dairy farming and rural employment in Maharashtra. saam tv
बिझनेस

काय आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना? जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Government Scheme : ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट आणि वनहक्क धारकांना पशुपालन व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी ही योजना आहे. अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक शेतकरी, महिला बचत गट आणि वनहक्क धारक पात्र आहेत.

Bharat Jadhav

  • ग्रामीण शेतकऱ्यांसाठी विशेष योजना

  • सुमारे ११ लाखांपर्यंत आर्थिक मदत

  • गायी-म्हशी, शेड आणि उपकरणे उपलब्ध

ग्रामीण भागातील अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, वनहक्क धारक आणि महिला बचत गटांसाठी राज्य सरकारनं खास योजना आणली आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना’ राबवली जात आहे. या योजनेत लाभार्थ्यांना ५ दुधाळ गायी किंवा म्हशी (प्रत्येकी १ लाख, एकूण ५ लाख रुपये, ३ वर्षांचा विमा ६० हजार १८० रुपये, शेडसाठी ३ लाख आणि उपकरणांसाठी (कडबाकुट्टी यंत्र, फॉगिंग मशीन, मिल्कींग मशीन, सोलर इ.) २ लाख ७५ लाख असे मिळून सुमारे ११ लाख ३५ लाखांचे प्रकल्प साहित्य दिले जाते.

पहिल्या टप्प्यात ५० टक्के अनुदानाची रक्कम दिली जाते. तर जनावरांची खरेदी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित अनुदान डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात जमा केले जाते. या योजनेत, सर्वसाधारण प्रवर्गाला ५० टक्के आणि अनुसूचित जाती-जमातींना ७५ टक्के अनुदान दिले जाते. यासह दिव्यांगांसाठी ५ टक्के आणि महिलांसाठी ३० टक्के आरक्षण दिले जाते.

योजनेची पात्रता व अटी

अत्यल्पभूधारक (१ हेक्टरपर्यंत), त्यानंतर अल्पभूधारक (१–२ हेक्टर), तसेच वनहक्क धारक आणि महिला बचत गटांना प्राधान्याने लाभ दिले जाते.

लाभार्थ्याकडे किमान १ एकर स्वतःची जमीन असली पाहिजे. किंवा ५ वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा असले पाहिजे. (वनहक्क धारकांसाठी ही अट लागू नाही)

पशुपालन किंवा दुग्ध व्यवसायाचे शासकीय प्रशिक्षण किंवा २ वर्ष अनुभव असला पाहिजे.

तर वाटप होणारी जनावरे HF, जर्सी, गीर, सहीवाल इत्यादी असतील. १-२ महिने पूर्वी वेली आणि दुसऱ्या/तिसऱ्या वेतातील असली पाहिजेत.

निवडी नंतर १ महिन्यात शेड आणि साधनसामुग्री खरेदी करावी. जर असं केलं नाही तर यादीत शेवटचा क्रमांक मिळेल. तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी लाभार्थ्यांच्या शेड निर्मिती, साधनसामुग्री व जनावर खरेदीचा अहवाल (खरेदी पावती, छायाचित्रे, बँक तपशील, विमा) जिल्हा उपायुक्तांना सादर करावे लागतील.

कोणती कागदपत्रे हवीत

स्वतःच्या नावे ७/१२ उतारा किंवा कमीतकमी ५ वर्षाचा नोंदणीकृत भाडेपट्टा करार असावा.

वनहक्क धारकांसाठी ७/१२ वर इतर अधिकार नोंद किंवा जिल्हाधिकारीकडून अनुसूची प्रमाणपत्र असावे.

पशुपालन किंवा दुग्ध व्यवसायाचे शासकीय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा २ वर्ष अनुभव प्रमाणपत्र (स्थानिक पशुवैद्यक/दुध संस्थेकडून) नसल्यास प्रशिक्षण घेण्याचे हमीपत्र.

दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र असावे.

महिला बचत गट सदस्यत्व प्रमाणपत्र.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिलमध्ये वाढू शकतो महागाई भत्ता, नवीन अपडेट समोर

Famous Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; अल्झायमरशी झुंज देताना घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Live News Update: पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पाऊस

Daily horoscope today: महिन्याचा शेवट १२ राशींसाठी कसा होणार? या ५ राशींचं नशीब चमकून धनलाभ होणार, वाचा राशीभविष्य

ड्रग्स-वेश्या व्यवसायाची भीती दाखवली; मुंबईतल्या विवाहित महिलेला बोगस पोलिसांनी गंडवलं

SCROLL FOR NEXT